चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा (IPL 2021 auction) लिलाव चेन्नईत सुरु आहे. हा लिलाव कार्यक्रम अखेरच्या टप्प्यात आला आहे. या लिलावामध्ये काही खेळाडू हे नशीबवान ठरले. त्यांना आपल्या बेस प्राईजपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज खेळाडूंनी कोटींची उड्डाणं घेतली आहे. दरम्यान या लिलवात शाहरुख खानला (ShahRukh Khan) प्रिती झिंटाच्या (Preeti Zinta) किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केलं आहे. त्यामुळे शाहरुख आगामी मोसमात पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. (ipl 2021 auction shahrukh khan will play for Punjab kings team)
Shahrukh Khan is a Punjab King! ?#SaddaPunjab #PunjabKings #IPLAuction2021 pic.twitter.com/IMGW9DL6Qv
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 18, 2021
पंजाबने शाहरुखला 5 कोटी 25 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. शाहरुखला त्याच्या बेस प्राईजच्या 26 पट जास्त रक्कम मिळाली आहे. त्याची बेस प्राईज ही 20 लाख इतकी होती. शाहरुखला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रिती झिंटा इरेला पेटली होती. त्यामुळं दिल्ली आणि RCB ने खूप रस दाखवून बोली वाढवली. मात्र अखेर शाहरुख पंजाबचाच झाला. शाहरुखने तामिलनाडू प्रिमियर लीगमध्ये शानदार कामगिरी केली होती.
Shahrukh Khan, the bowling all-rounder vi sadda hua for 5.25 CR! ?❤️#SaddaPunjab #PunjabKings #IPLAuction2021
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 18, 2021
युवा ऑलराउंडर कृष्णप्पा गोतम (krishnappa gowtham) महागडा अनकॅप्ड (एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला) खेळाडू ठरला आहे. कृष्णप्पासाठी चेन्नई सुपर किंग्जने 9 कोटी 25 लाख मोजले आहेत. त्याची बेस प्राईजही 20 लाख इतकी होती. याआधी कृणाल पांड्या हा महागडा अनकॅप्ड प्लेअर ठरला होता. कृणालला मुंबईने 8.8 कोटीमध्ये खरेदी केलं होतं.
The bidding was ON between KKR, CSK & SRH. K Gowtham's base price was 20L INR & his bid reached 9.25Cr INR – He is SOLD to @ChennaiIPL @Vivo_India #IPLAuction
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
दिल्ली कॅपिटल्सने (dc) एम सिद्धार्थ ला 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तर मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या (Tushar Deshpande) पदरी निराशा पडली आहे. तो अनसोल्ड राहिला आहे. त्याची बेस प्राईज 20 लाख होती. तुषार गेल्या मोसमात दिल्लीकडून खेळला होता. तर करणवीर सिंहही अनसोल्ड राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने (Chris Morris) आयपीएलच्या हंगामात (IPL Auction) इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली (Chris Morris IPL bid price) लागली आहे. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मॉरिसची बेस प्राईजही 75 लाख रुपये इतकी होती.
????? ?? ??????????’? ?????:
“I’m back”. ? #HallaBol | #RoyalsFamily | #IPLAuction | #IPL2021 | @Tipo_Morris pic.twitter.com/xLQYKoLzaw
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 18, 2021
संबंधित बातम्या :
(ipl 2021 auction shahrukh khan will play for Punjab kings team)