मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (Indian Premier league) आता एक महिना शिल्ल राहिला आहे. सर्व फ्रँचायजींसह, खेळाडू आणि क्रिकेट चाहतेही उत्सुक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लिलावातून प्रत्येक संघांनी आपल्या ताफ्यात तोडीसतोड फलंदाज घेतले आहेत. दरम्यान गेल्या मोसमात साखळी फेरीत बाहेर पडलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 14 व्या मोसमाआधी मोठा झटका लागला आहे. कार बनवणारी प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी (Skoda) स्कोडाने सीएसके सोबतच्या स्पॉन्सरशीपमधून आपले नाव मागे घेतलं आहे. (ipl 2021 Automobile company Skoda has remove his name a sponsorship deal with Chennai Super Kings)
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई आणि स्कोडा यांच्यात 25 कोटी रुपयांचा प्रायोजकत्वाचा करार होणार होता. पण स्कोडाने हा करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चेन्नईसाठी हा मोठा दणका आहे. अनेक फ्रँचायजींना आयपीएलमध्ये स्पॉनरशीपमधून कोटींची कमाई होते.
इनसाइड स्पोर्टच्या एका रिपोर्टनुसार, “आयपीएलमधील संबंधित टीमच्या कामगिरीवर अनेक कंपन्या या प्रायोजक्तवाचा करार करतात. जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज दमदार कामगिरी करत होती तेव्हा अनेक ब्रँड कंपन्या चेन्नईसोबत करार करण्यासाठी उत्सुक असायच्या. पण गेल्या मोसमातील चेन्नईची निराशाजनक कामगिरी आणि धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती यामुळे कंपन्यांना आता चेन्नईमध्ये स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळे चेन्नईसाठी ही धोक्याची घंटा आहे.”
स्कोडाने माघार घेतल्याने आता प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी मिंत्रा (Myntra) चेन्नईशी करार करण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार सीएसके आणि मिंत्रामध्ये 22-23 कोटींचा करार होऊ शकतो.
चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम निराशाजनक ठरला. सुरेश रैना आणि हरभजन सिंह या महत्वाच्या 2 खेळाडूंनी ऐनवेळेस माघार घेतली. तर कर्णधार महेंद्र सिंह धोनी अपयशी ठरला. धोनीला त्या मोसमात धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. चेन्नने पहिल्या 12 मोसमात दरवेळेस प्लेऑफमध्ये (टॉप 4) प्रवेश मिळवला होता. मात्र गेल्या मोसमात चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. यामुळे चेन्नई या मोसमात जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) , इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरी निशांत.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 Automobile company Skoda has remove his name a sponsorship deal with Chennai Super Kings)