चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स अर्थात CSK… आयपीएलमधली (IPL 202) मोठी फ्रँचायझी… ही फ्रँचायझी अनुभव आणि युवा जोशाने ओतप्रोत भरलेली आहे. या संघाला एम. एस. धोनीसारखं (MS Dhoni) कुल नेतृत्व आहे. या संघात एकहाती सामना फिरवण्याची ताकद असणारा ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आहे. सुरेश रैना (Suresh Raine) आणि रॉबिन उथप्पासारखे (Robin Uthappa) ‘टॉप गिअर’ टाकणारे आक्रमक खेळाडू आहेत. त्याचवेळी या संघात जगदीशन (Jagdishan), ऋतुराज (Ruturaj Gaikwad), साई किशोर (Sai Kishore) या तरुण तरण्याबांड खेळाडूंची फौज आहे, ज्या फौजेला आक्रमण करायचं देखील माहिती आहे आणि मौज मजा करायची देखील माहिती आहे. सीएसकेच्या गोटातला असाच एक मौजमजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (IPL 2021 Chennai super kings player Vaathi Song dance)
सीएसकेच्या कॅम्पमध्ये मौज मजा आणि धमाल मस्ती आणि नाचगाणं चालू असलेला व्हिडीओ खुद्द चेन्नईच्या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय ‘मास्टर’ सिनेमातील वाथी कमिंग गीतावर चेन्नईचे खेळाडू डान्स करताना दिसून येत आहेत.
वाथी कमिंग हे दक्षिणेतलं लोकप्रिय गीत… या गीताची भुरळ अनेकांना पडलीय. हे गीत वाजायला लागलं की अनेकांचे पाय ठेका धरायला मजबूर होतात. चेन्नईचे युवा खेळाडू तरी कसे अपवाद असतील. याच गीतावर चेन्नईच्या साई किशोर, ऋचुराज गायकवाड, एन. जगदीशन आणि हरी निशांत या युवा खेळाडूंनी ताल धरला.
चेन्नईचे खेळाडू मौज मजेत न्हाऊन निघाल्यानंतर हीच धमाल मस्ती सध्या भारतीय टीमचा हिस्सा असलेला दीपक चाहर मिस करतोय. चेन्नईने पोस्ट केलेल्या व्हिडीओखाली ‘आय मिस धीस’ म्हणत त्याने ही मौज मजा मिस करत असल्याचं म्हटलंय.
भारतीय महिला संघाने (India Women Cricket team) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर सेलिब्रेशनवेळी वेदा कृष्णमुर्तीसह (veda krishnamurthy) आणखी तीन महिला खेळाडूंनी तमीळ गाण्यावर जोरदार ठुमके लगावले. भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमुर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहकाऱ्यांच्या सोबतीने डान्स डान्स केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. वेदा, आकांक्षा कोहली (Akansha Kohli), व्हीआर वनिता (VR Vanitha) आणि ममता माबेन (Mamata Maben) या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसून येत आहेत.
हे ही वाचा :
‘नजर हटी दुर्घटना घटी…’, 22 वर्षीय युवा बोलर्सकडून MS धोनी क्लीन बोल्ड, पण तो बोलर कोण?
IPL 2021 : नवा आयपीएल हंगाम, नवा रंग; दिल्ली कॅपिटल्सची जर्सी लॉन्च