नवी दिल्ली : आयपीएलमधील (IPL 2021) सर्वांत उत्कंठावर्धक सामना की ज्या सामन्याची क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होते. आज दिल्लीच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. चेन्नई आणि मुंबई आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद जिंकले आहे तर चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा आयपीएलचा करंडक उंचावला आहे. (IPL 2021 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Streaming when And Where to Watch online in Marathi 1st May)
यंदाच्या मोसमात चेन्नईची टीम तुफान फॉर्मात आहे. पहिला सामना गमावल्यानंतर नंतरच्या पाच सामन्यांत चेन्नईने प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलं. तर दुसरीकडे मुंबईचा संघ सध्या चाचपडताना दिसत आहे. चेन्नईच्या मैदानावर मुंबईला विशेष पराक्रम करता आला नाही. मात्र मैदान बदलताच दिल्लीच्या रणांगणावर मुंबईने राजस्थानला आस्मान दाखवलं. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांत 3 विजय मिळवले आहेत तर 3 वेळा त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
आजच्या सामन्यात चेन्नईच्या विजयरथाला रोखण्याचं मोठं आव्हान मुंबईपुढे असणार आहे. तसंच राजस्थानला हरवून आत्मविश्वास दुणावलेल्या मुंबईला आज चेन्नईला हरवून गुणतालिकेत वरच्या क्रमाकांवर झेप घेण्याची संधी आहे. तर चेन्नईसमोर विजयरथ कायम धावता ठेवण्याचं आव्हान असेल.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings vs Mumbai Indians) यांच्यातील सामना आज 1 मे रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता टॉस होईल.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings vs Mumbai Indians) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.
तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.
(IPL 2021 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Streaming when And Where to Watch online in Marathi 1st May)
हे ही वाचा :
IPL 2021 : ‘शाब्बास रं वाघा’, बंगळुरुचं कंबरडं मोडणाऱ्या हरप्रीतच्या पाठीवर विराटची कौतुकाची थाप!