नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या पर्वाला (IPL 2021) सुरु होऊन दोन दिवस झाले आहेत आणि दोन दिवसांत भारतीय क्रिकेट संघासाठी दोन वाईट बातम्या आहेत. या बातम्या टीम इंडियाच्या खेळाडूंच्या दुखापतीशी संबंधित आहे. पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royals Challengers Banglore) यांच्यातील सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. आता दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी इशांत शर्माही (Ishant Sharma) अनफिट असल्याची माहिती आहे. (IPL 2021 CSK vs DC Ishant Sharma Injured Before CSK Match)
इशांत शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे इशांत शर्मा चेन्नई विरुद्ध दिल्लीच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्येही तो जखमी झाला होता. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन केले. 13 व्या आयपीएल हंगामात हॅमस्ट्रिंगच्या तणावामुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर इंशात शर्माही टीम इंडियाबरोबर ऑस्ट्रेलिया दौर्याचा भाग नव्हता.
दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमधून मिळालेल्या माहितीनुसार, इशांत शर्मा पूर्णपणे फिट नाही. यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश झाला नाही. तो सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आला नव्हता. तो टीम ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे त्याच हॉटेलमध्ये राहिला. आयपीएल 2020 मध्ये इशांतला हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे स्पर्धा मध्यभागी सोडली गेली होती. उमेश यादवही दुखापतीच्या कारणास्तव दि्लीच्या टीममध्ये खेळू शकला नाही, अशी चर्चा आहे.
आयपीएल 2021 च्या (IPL2021) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनफिट दिसला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना तो नीटपणे थ्रो देखील करु शकत नव्हता. हार्दिक पांड्या अनफिट आहे हे सातव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर ठळकपणे जाणवलं. क्रुणाल पंड्याच्या बोलिंगवर विराट कोहलीने खेळपट्टीच्या बाजूला बॉल टोलवला आणि धाव घेण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला इशारा केला परंतु मॅक्सवेलने नकार दिला. याचदरम्यान विराट कोहली क्रीजच्या फार पुढे आला होता. आपण रनआऊट होणार हे कोहलीला किंबहुना लक्षात आलं होतं. बॉल हार्दिक पांड्याकडे गेला होता. मात्र त्याला व्यवस्थित थ्रो टाकता न आल्याने कर्णधार कोहली आरामात क्रीजवर पोहोचला. हार्दिकने जर उत्तम थ्रो मारला असता तर कोहली आऊट झाला असता. कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा दिसला असता.
आरसीबीच्या डावाच्या आठव्या षटकातील तिसर्या चेंडूवर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे पुन्हा दिसून आले. राहुल चहरच्या चेंडूवर कोहलीने स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅन दरम्यान शॉट मारला. चेंडू हार्दिककडे गेला आणि तो चेंडू वेळेवर फेकू शकला नाही. त्याने पहिल्यांदा रोहितला बॉल फेकला आणि रोहितने मग इशान किशनकडे बॉल फेकला.
(IPL 2021 CSK vs DC Ishant Sharma Injured Before CSK Match)
हे ही वाचा :
IPL 2021 : चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, ‘यांच्यामुळे’ पराभव झाला म्हणत धोनी भडकला!
IPL 2021 : सॅम vs टॉम, सख्ख्या भावाने सख्ख्या भावाला तुडवला, 6 बॉलमध्ये 23 धावा झोडल्या!