मुंबई : रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) वादळी खेळीने आणि भेदक फिरकीच्या बळावर चेन्नईने बंगळुरुला (CSK vs RCB) 69 धावांनी पाणी पाजलं. सलग चार मॅच जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या बंगळुरुला खाली खेचत चेन्नईने अव्वलस्थानी झेप घेतली. या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. जाडेजाने पर्पर कप होल्डर हर्षल पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये 37 धावा चोपल्या. त्यामुळे कर्णधार धोनी (MS Dhoni) भलताच खूश होता. त्याने फिल्डिंग करता-करता खुशी-खुशीत जाडेजाच्या साथीने ‘स्टम्पमागून कॉमेन्ट्री’ सुरु केली. पण योग्य वेळ आल्यावर आपल्या काँमेन्ट्रीला आवरही घातला आणि तशी सूचना जाडेजालाही दिली. (IPL 2021 CSK vs RCB Ab hindi Mai Mat Baat Kar Ms Dhoni Voice Captured Stump Mike)
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रविवारी बंगळुरुविरुद्ध चेन्नई असा तुल्यबळ सामना पार पडला. या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जाडेजाने वादळी खेळी करत हर्षल पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये 37 धावा कुटल्या. 192 धावांचं विशाल टार्गेट चेन्नईने बंगळुरुसमोर ठेवलं. त्यानंतर मैदानात बंगळुरुची टीम बॅटिंगसाठी आली तर चेन्नईची टीम फिल्डिंगसाठी आली. विराट कोहली लवकर बाद झाला होता. देवदत्त पडीक्कलही कमाल करु शकला नाही. शेवटी बंगळुरुची मदार मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्स यांच्यावर आली. दोघांनीही चेन्नईशी होत हात करण्याचा प्रयत्न केला. ही जोडी मैदानावर असताना धोनीची स्टम्पमागून हिंदी कॉमेन्ट्री सुरु होती.
मॅक्सवेल-डिव्हिलियर्स या घातक जोडीला आऊट करण्यासाठी धोनी जाडेजाला हिंदीमध्ये टिप्स देत होता. दोघेही विदेशी खेळाडू खेळपट्टीवर असल्याने धोनी जाडेजाला हिंदीमध्ये बोलत होता. स्टम्पमागून तो जाडेजाला बोलिंगमध्ये व्हेरिएशन आणायला सांगत होता. झालंही तसंच…. जाडेजाने धोनीची सल्ला ऐकला आणि जड्डूच्या 11 व्या ओव्हरमधील एका बॉलने डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडला. दोघांनीही हसत-हसत आणि एकमेकांना टाळी देत एबीडीच्या विकेट्सचं सेलिब्रेशन केलं.
त्यानंतर मैदानात भारतीय खेळाडू हर्षल पटेलने पाऊल ठेवलं. लागलीच धोनीने जाडेजाला सूचना केली. “अब हिंदी में बात नही करेगा, तू ही मत कर…” धोनीने जाडेजाला दिलेला हा सल्ला ऐकून धोनीच्या जवळ फिल्डिंगला उभ्या असलेल्या सुरेश रैनाला मात्र हसू अनावर झालं. त्याने धोनी आणि जाडेजाकडे पाहून हास्याची लकेर फुलवली.
बंगळुरुकडून 20 वी ओव्हर पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेल टाकायला आला. हर्षलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हर्षलचा विश्वास दुणावलेला होता. मात्र जाडेजाने हर्षलचं सिक्सने स्वागत केलं. जाडेजाने सलग 4 सिक्स लगावले. जाडेजाने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. मात्र हा नो बोल देण्यात आला.
त्यामुळे चेन्नईला 1 अतिरिक्त धाव मिळाली. जाडेजाने या पुढच्या चेंडूवर सलग चौथा सिक्स लगावला. यासह जाडेजाने तुफानी अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर जाडेजाने 2 धावा घेतल्या. त्यानंतर पुन्हा त्याने 5 वा सिक्स खेचला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जाडेजाने चौकार लगावला. यासह जाडेजाने 28 चेंडूत 5 सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा ठोकल्या
(IPL 2021 CSK vs RCB Ab hindi Mai Mat Baat Kar Ms Dhoni Voice Captured Stump Mike)
हे ही वाचा :
IPL 2021 : आर. अश्विनच्या आयपीएल सोडण्याच्या निर्णयावर कोच रिकी पाँटिंगचं ट्विट, म्हणाला…