मुंबई : मयांक अग्रवालची (Mayank Agrawal) नाबाद 99 रन्सची खेळी शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) 69 रन्ससमोर फिकी पडली. धवनच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबला 7 विकेट्सने हरवलं. सामन्यादरम्यान एका रन्सआऊटची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली. पंजाबचा आक्रमक खेळाडू दीपक हुडा (Dipak Hooda) विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. शिमरन हेटमायरने (Shimron hetmyer) शानदार अंदाजात दीपक हुडाला रनआऊट केलं. सोशल मीडियावर हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. (IPL 2021 Dc vs PBKS Dipak Hooda Run Out Viral Video)
13 व्या ओव्हरनंतर पंजाबच्या 88 रन्सवर 3 विकेट पडल्या होत्या. 14 व्या ओव्हरला अक्षर पटेल बोलिंगसाठी बोलिंग मार्कवर आला. त्याच्या बॉलवर मयांक अग्रवालने शॉट्स खेळला आणि रन्स घेण्यासाठी धावला. त्याच्या जोडीला दीपक हुडा होता. दोघेही रन्स घेण्यासाठी धावले पण हेटमायरने चांगली फिल्डिंग केली. नॉन स्ट्रायकर एंडला असलेला दीपक हुडा रन्स घेण्यासाठी धावला खरा पण हेटमायरच्या हातात बॉल पाहून तो माघारी वळला.
तोपर्यंत मयांक अग्रवालने नॉन स्ट्रायकर एंड गाठलं होतं. दोघेही नॉन स्ट्रायकर एंडलाच होते. साहजिकच हेटमायरने बोलर अक्षय पटेलकडे थ्रो केला. त्याने स्टम्पला बॉल लावला, बेल्स पाडले आणि स्ट्रायकर इंडला म्हणजेच कीपर रिषभ पंतकडे थ्रो केला. त्याने त्याचं काम फत्ते केलं.
— Cricsphere (@Cricsphere) May 2, 2021
परंतु नेमकं आऊट कोण झालं, असा अंपायरलाही प्रश्न पडला. थर्ड अंपायरनेही बऱ्याच वेळा चेक केलं. बराच वेळ घेतल्यानंतर थर्ड अंपायरने अखेर दीपक हुडाला रन्स आऊट घोषित केलं.
शिखर धवनच्या धमाकेदार 69 रन्सच्या बळावर दिल्लीने पंजाबला 7 विकेट्सने नमवलं. तसंच गुणतालिकेतही शिखर गाठलं. दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम पंजाबला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पंजाबला 166 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने आक्रमक सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले. शिखर धववने शानदार खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
(IPL 2021 DC vs PBKS Kagi
(IPL 2021 Dc vs PBKS Dipak Hooda Run Out Viral Video)
हे ही वाचा :
IPL 2021 Purple Cap | हर्षल पटेलकडे Purple Cap कायम, आवेश खान आणि ख्रिस मॉरिसमध्ये कडवी झुंज