अहमदाबाद : मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. नुसताच खेळत नाही तर आपल्या बॅटच्या जादूने तो भल्याभल्यांना आपली तारीफ करायला भाग पाडतोय. बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने कमाल करुन दाखवली. त्याने एकसोबतच बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) रेकॉर्ड तोडला. त्याच्या या कारनाम्यामुळे दिग्गज खेळाडूही त्याचं कौतुक करतायत. (IPL 2021 Dc vs RCb prithvi Shaw Break Virat kohli And Rohit Sharma Record)
सर्वाधिक कमी वयात पृथ्वी शॉने 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा पूर्ण करताना त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला. सर्वात कमी वयात 1000 धावा पूर्ण करणारा पृथ्वी दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने केवळ 21 वर्ष आणि 169 दिवसांत ही कामगिरी करुन दाखवली आहे.
विराट कोहलीने 22 वर्ष आणि 175 दिवस तर रोहित शर्माने 22 वर्ष आणि 340 दिवस एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी घेतले होते. मुंबईकर पृथ्वी शॉने दोघांनाही मागे टाकत केवळ 31 वर्ष आणि 169 दिवसांमध्ये 1000 धावा पूर्ण करत रोहित-विराटचा रेकॉर्ड मोडला आहे.
पृथ्वी शॉने संजू सॅसमनचा देखील रेकॉर्ड तोडला. संजूने 21 वर्ष आणि 183 दिवसांचा असताना आयपीएलमध्ये 1000 धावा केल्या होत्या.
पृथ्वी शॉने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 18 चेंडूत 21 धावांची खेळी केली, ज्यात तीन चौकारांचा समावेश होता. या डावात आठवी धाव घेताच त्याने आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. पृथ्वी शॉने 44 सामन्यांत 1000 धावांचा टप्पा गाठला.
रिषभ पंत- 20 वर्ष 218 दिवस
पृथ्वी शॉ- 21 वर्ष 169 दिवस
संजू सॅमसन- 21 वर्ष 183 दिवस
(IPL 2021 Dc vs RCb prithvi Shaw Break Virat kohli And Rohit Sharma Record)
हे ही वाचा :
IPL 2021 : ‘कुणी खेळाडू देतं का खेळाडू…’ राजस्थानवर संकट, कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं…!
IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, ए बी डिव्हिलियर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!