नवी दिल्ली : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या हंगामाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या हंगामासाठीची नवी जर्सी (Delhi Capitals jersey) लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिल्लीच्या टीमने नव्या जर्सीचं अनावरण केलं आहे. या हंगामात दिल्लीची टीम नव्या रंगात दिसून येणार आहे. दिल्लीच्या टीमने नव्या जर्सीसहित शेअर केलेला व्हिडीओ क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. रसिकांनीही दिल्लीला नव्याय हंगामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (IPL 2021 Delhi Capitals Launch new jersey)
दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने यावेळी दिल्लीच्या फॅन्सच्या हातून नव्या जर्सीचं अनावरण केलं आहे. दिल्लीच्या मोजक्या फॅन्सना फ्रेंचायजी ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं आणि नंतर त्यांच्या हातून नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. विशेष फॅन्सना कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनसोबत गप्पा मारण्याची संधीही मिळाली. सोशल मीडियावर लोक दिल्लीच्या नव्या जर्सीची चर्चा करत आहेत.
A surprise that left these superfans and all of us like ??
?️ | We unveiled #NayiDilliKiNayiJersey in the most wholesome way possible ?
Disclaimer: All DC staff and fans involved in this surprise were tested for COVID-19 beforehand.#YehHaiNayiDilli #IPL2021 @StayWrogn pic.twitter.com/PAygUzKWyf
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 19, 2021
यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीला जास्त बटबटीत बनवण्यात आलं आहे. जर्सीवर गडद निळा आणि लाल रंगाचा वापर करण्यात आलाय. एकूणच पाहताक्षणी डोळ्यात भरणारी ही जर्सी आहे. जर्सीला आक्रमक बनवून टीम मॅनेजमेंटने आयपीएलमधील दुसऱ्या संघांना आतापासूनच आव्हान दिलं आहे.
आयपीएलचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगलोर यांच्यात पार पडणार आहे. दिल्लीची पहिली मॅच चेन्नईशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने यावेळी स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरीवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करन, सैम बिलिंग्स अशा दिग्गज खेळाडूंना संघात सामिल करुन घेतलं आहे.
श्रेयस अय्यर (कप्तान), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, आर. अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, आवेश खान, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिच नोखिया, मार्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमायर, क्रिस वोक्स, डेनियर सैम्स, स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरीवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्स
(IPL 2021 Delhi Capitals Launch new jersey)
हे ही वाचा :
VIDEO | 14 व्या पर्वासाठी ‘मिस्टर आयपीएल’ सज्ज, मैदानात जोरदार सराव
IPL 2022 | आयपीएलच्या पुढील मोसमात दिसणार ‘दस का दम’, 2 नव्या टीमचा सहभाग, ‘या’ महिन्यात होणार लिलाव
IPL 2O21 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी RCBला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूची माघार