चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (Indian Premier League) मोसमातील 13 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी दिल्लीसाठी दिलासादायक बातमी आली आहे. दिल्लीचा स्टार गोलंदाज (Ishant Sharma) इशांत शर्मा दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आनंदाची बाब आहे. (ipl 2021 delhi capitals pacer Ishant Sharma recovers from injury)
दुखापतीतून सावरल्याने इशांत दिल्लीसाठी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र इशांतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की आणखी काही सामने विश्रांती देण्यात येणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. इशांतला पायाच्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातील पहिल्या 3 सामन्यांना मुकावे लागले होते. इशांतला पायाची दुखापत झाल्याची माहिती दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने दिली होती. मात्र इशांत पूर्णपणे फीट असल्याने दिल्लीची गोलंदाजीला आणखी मजबूत झाली आहे.
इशांत शर्मा आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पहिली मॅच खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला दुखापतीमुळे मोसमातून माघार घ्यावी लागले होती. या दुखापतीमुळे इशांतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावे लागले होते. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून इशांतने पुनरागमन केलं होतं. मात्र त्याला त्यानंतर पुन्हा दुखापतीने ग्रासलं. यामुळे इशांतला पहिल्या 3 सामन्यांना मुकावे लागले होतं.
इशांतने आयपीएलमध्ये आतापर्यंत 90 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 36.19 च्या एव्हरेजने आणि 8.09 च्या इकॉनॉमी रेटने 72 विकेट्स घेतल्या आहेत. 12 धावा देत 5 विकेट्स ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी आहे.
दरम्यान या 14 व्या पर्वातील 13 व्या सामन्यात दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यात लढत रंगणार आहे. या मोसमात हे दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. उभयसंघ आतापर्यंत एकूण 28 सामन्यांत आमने भिडले आहेत. यामध्ये मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 12 वेळा मुंबईचा पराभव केला आहे. गत मोसमात या दोन्ही संघांचा एकूण 4 वेळा आमनासामना झाला. यामध्ये मुंबईने दिल्लीवर मात केली. या 4 पैकी 2 सामने हे साखळी फेरीतील होते. तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये हे क्वालिफायर आणि फायनल मॅचचा समावेश होता.
मुंबईने या 14 व्या मोसमात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यापैकी पहिल्या सामन्यात पराभव झाला. मात्र त्यानंतरचे 2 सामने मुंबईने जिंकले. त्यामुळे दिल्लीला पराभूत करत मुंबईला विजयाची हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. त्यामुळे मुंबई हा कारनामा करणारा की दिल्ली विजय मिळवणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 delhi capitals pacer Ishant Sharma recovers from injury)