मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) सलामीच्या सामन्याला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल ही स्पर्धा जशी धावांची लूट करणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते तशीच ती कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची स्पर्धा म्हणूनही ओळखली जाते. आयपीएल स्पर्धेमधून कितीतरी बोलर्सने आंतरराष्ट्रीय संघात एन्ट्री मिळवलीय. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत किती आणि कोणत्या बोलर्सने हॅट्रिक मिळवल्या, कोणत्या मोसमात मिळवल्या, हे आपण पाहुयात… (IPL 2021 IPL Histrory Who taken Hat trick)
2008 मध्ये पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजीच्या नावावर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP)विरुद्ध खेळताना त्याने हा कारनामा केला होता. याच मोसमात अमित मिश्रानेही हॅटट्रिक घेऊन आयपीएलमध्ये चमकदार पदार्पण केले. मिश्रानेआयपीएल कारकिर्दीची पहिली हॅटट्रिक डेक्कन चार्जर्सविरूद्ध घेतली. बालाजी आणि मिश्रानंतर सीएसकेकडून खेळणाऱ्या अँटिनीने कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध खेळताना हॅटट्रिक घेतली होती.
आयपीएलच्या इतिहासात युवराज सिंग हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने एका हंगामात 2 हॅटट्रिक घेतल्या आहेत. 2009 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना युवीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि हैदराबादविरुद्ध हॅटट्रिक विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय रोहित शर्मानेही हॅटट्रिक विकेट घेऊन सगळ्यांना तोंडात बोटे घालायला लावली. रोहितकडून खेळताना रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांना लागोपाठ तंबूत धाडलं होतं.
2010 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून खेळणार्या प्रवीण कुमारने हॅटट्रिक घेतली. प्रवीणकडे राजस्थान रॉयल्सच्या तीन बॅट्समनना लागोपाठ आऊट केलं.
2011 च्या आयपीएलमध्येही केवळ एका हॅट्रिकची नोंद झाली. यावेळी अमित मिश्राने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध हॅटट्रिकसह 4 बळी मिळवून धडाकेबाज कामगिरी केली. या मोसमात मिश्रा हैदराबाद संघाकडून खेळला.
2012 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या अजित चंडिलाने पुणे वॉरियर्सविरूद्ध हॅटट्रिक मिळवली. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर अजित चंडिला याचं फार लवकर संपुष्टात आलं. चंडिला आयपीएलचा फक्त एक हंगाम खेळू शकला.
2013 च्या आयपीएलमध्ये 2 हॅटट्रिक झाल्या. सुनील नरेन आणि अमित मिश्रा यांनी हॅटट्रिक विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना नरेनने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध हॅटट्रिक मिळवली. तर हैदराबादकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरूद्ध अमित मिश्राने हॅटट्रिक विकेट घेण्याचा पराक्रम केला.
2014 च्या आयपीएलमध्ये प्रवीण तांबे आणि शेन वॉटसन यांनी हॅटट्रिक विकेट्स घेतल्या. प्रवीण तांबे याने केकेआरविरूद्ध हा पराक्रम केला होता. या मोसमात तांबे राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्याचबरोबर शेन वॉटसनने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हैदराबादविरुद्ध हॅटट्रिक विकेट्स घेतल्या.
2016 च्या आयपीएलमध्ये अक्षर पटेलने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना गुजरात लायन्सविरूद्ध हॅटट्रिक घेतली. अक्षर पटेलने 5 चेंडूत 4 विकेट्स मिळवल्या होत्या.
2017 च्या आयपीएल हंगामात तीन गोलंदाजांनी हॅट्रिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. सॅम्युअल बद्री, अँड्र्यू टाय आणि जयदेव उनाडकट यांनी हॅटट्रिक घेतली होती. आरसीबीकडून खेळताना बद्रीने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक केली. अँड्र्यू टायने गुजरात लायन्सकडून खेळताना रायझिंग पुणे सुपर जाएंट्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली. याशिवाय पुण्याकडून खेळणाऱ्या उनाडकटने हैदराबादविरुद्ध हॅट्रिक घेतली.
सॅम करन आणि श्रेयस गोपाळ यांनी 2019 च्या आयपीएलमध्ये हॅटट्रिक विकेट घेतल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना सॅम करनने दिल्ली कॅपिटलविरूद्ध हॅटट्रिक विकेट घेतल्या. तर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना श्रेयस गोपाळने आरसीबीविरूद्ध हॅटट्रिक विकेट्स घेतल्या.
(IPL 2021 IPL Histrory Who taken Hat trick)
मुंबई :
IPL 2021 : कोहलीला ‘विराट’ रेकॉर्ड करण्याची संधी, असा कारनामा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो!
चिडक्या डिकॉकवर शोएब अख्तर भडकला, म्हणाला, ‘मला त्याच्या खेळभावनेवर शंका’, पाहा नेमकं प्रकरण काय…?
‘तुझा आवडता क्रिकेटर कोण?’, रिषभची मैत्रीण इशा नेगीचं ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ उत्तर, चाहते म्हणाले….