नवी दिल्ली | मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. मुंबईने चेन्नईवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेले 219 धावांचे तगडे आव्हान मुंबईने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. यासह रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पलटणने चेन्नईवर 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. कायरन पोलार्ड (kieron pollard) हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पोलार्डनेही विक्रम रचला. तसेच मुंबईने या विजयासह ऐतिहासिक कामगिरी केली. (ipl 2021 mi vs csk kieron pollard record break innings help mumbai indians to make historic win against chennai super kings)
पोलार्डने चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात 34 चेंडूत 6 फोर आणि 8 सिक्ससह 255.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 87 धावा चोपल्या. या दरम्यान पोलार्डने 17 चेंडूत अर्धशतक लगावलं. यासह पोलार्ड या 14 व्या मोसमात दिल्लीच्या पृथ्वी शॉला पछाडत कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
पोलार्डने आपल्या खेळीत एकूण 8 सिक्स लगावले. त्यापैकी 3 सिक्स हे 90 मीटरपेक्षा अधिक लांबीचे लगावले. पोलार्डने 93, 97 आणि 105 मीटर लांबीचे गगनचुंबी सिक्स लगावले.
पोलार्डने बॅटिंगसह बोलिंगनेही कमाल केली. पोलार्डने मुंबईकडून या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 2 ओव्हरमध्ये 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे पोलार्डने बॅक टु बॅक 2 विकेट्स घेतल्या. पोलार्डने फॅफ डु प्लेसीस आणि सुरेश रैना या घातक फलंदाजांना बाद केलं.
पोलार्डने या सामन्यात बोलिंगसह बॅटिंगने शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी पोलार्डला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह पोलार्ड चेन्नई विरुद्ध मुंबईकडून सर्वाधिक 4 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार घेणारा खेळाडू ठरला.
आयपीएलच्या इतिहासात मुंबईने पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. याआधी मुंबईने पंजाब विरुद्ध 2019 मध्ये 198 आणि 2017 मध्ये 199 धावा यशस्वीरित्या चेस केल्या होत्या. तसेच 2014 मध्ये राजस्थानने दिलेले195 धावांचे विजयी आव्हान मुंबईने यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 mi vs csk kieron pollard record break innings help mumbai indians to make historic win against chennai super kings)