चेन्नई : आयपीएलच्या (IPL 2021) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) या सलामीच्या लढतीत फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची अधिक चर्चा राहिली. बंगळुरुच्या हर्षल पटेलने (Harshal Patel) पाच विकेट्स घेऊन मुंबई इंडियन्सचं कंबरडं मोडलं तर मुळचा न्यूझीलंडचा असलेल्या काईल जॅमिसनच्या (kyle jamieson) भेदक गोलंदाजीपुढे मुंबईकर फलंदाजांची बॅट म्यान झाली. त्याच्या भेदक यॉर्करने मुंबईचा आक्रमक फलंदाज क्रुणाल पांड्याच्या (Krunal pandya) बॅटचे दोन तुकडे केले. थोडावेळ क्रुणाल पांड्यालाच विश्वास बसला नाही. परंतु जॅमिसनचा यॉर्करच एवढा घातक होता की बॅटलाही हादरा बसून तिचं दोन भागांत रुपांतर झालं. (IPL 2021 MI vs RCB kyle jamieson Fantastic Yorker Break Krunal pandya bat)
आरसीबीने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 19 व्या ओव्हरमध्ये आरसीबीचा गोलंदाज कायल जॅमिसन बोलिंग मार्कवर आला. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जॅमिसनने एक खतरनाक यॉर्कर फेकला. या यॉर्करचा सांमना करण्यासाठी क्रुणाल सरसावला. मात्र यॉर्कर एवढा घातक होता की क्रुणालच्या हातात असलेल्या बॅटच्या जॅमिसनच्या यॉर्करने दोन तुकडे केले. क्रुणाल फक्त जॅमिसनकडे काही काळ पाहत राहिला. कारण नंतर क्रुणालच्या हातामध्ये केवळ हँडल होता, बॅटचा तुकडा पडून तो जमिनीवर लेटला होता.
What a bowling by Jamieson and broke the Krunal Bat !!! #IPL2021 #MIvRCB #IPL #RCB #MI pic.twitter.com/z4QqJx5kTu
— Ramims Vlogs (@RamimsVlogs) April 9, 2021
आयपीएल सुरु होण्याअगोदर आरसीबीने ऑक्शनमध्ये न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काइल जॅमिसन याच्यावर 15 कोटी रुपयांची बोली लावली. जवळपास 7 फूट उंचीच्या जॅमिसनने भारताविरुद्ध 2020 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तो मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम गोलंदाज आहे, असं काही दिग्गजांचं मत आहे. परंतु आपल्या बोलिंग परफॉर्मन्सने त्याने टीकाकारांची तोंड बंद केली आहे. जॅमिसनने आपल्या पहिल्या वहिल्या आयपीएल मॅचमध्ये निर्धारित 4 ओव्हरमध्ये केवळ 27 रन्स देऊन 1 विकेट घेतली.
आरसीबीच्या हर्षल पटेल पुढे मुंबईकर फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा हर्षल पटेल जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांच्या आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने 4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे मुंबईचे सर्वांत आक्रमक फलंदाज इशान किशान, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, केरॉन पोलार्ड यांसारख्या बिग हिटरला त्याने तंबूत धाडलं.
(IPL 2021 MI vs RCB kyle jamieson Fantastic Yorker Break Krunal pandya bat)
हे ही वाचा :
IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीला दुखापत, क्रुणाल पांड्याचा बॉल विराटच्या डोळ्यावर