चेन्नई : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरुने 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) जुन्या फॉर्मात परत आल्याचं पाहायला मिळालं. त्याने मुंबई इंडियन्सच्या क्रुणाल पांड्याला (Krunal Pandya) 100 मीटर्सचा गगनचुंबी षटकार लगावला. यानंतर कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. (IPL 2021 Mi vs RCB Virat Kohli reaction Over Glenn Maxwell hit Longest Six)
ग्लेन मॅक्सवेल मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. मागील मोसमात पंजाबकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटची जादू चालली नव्हती. मात्र 14 व्या पर्वातील सलामीच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने मोक्यावर चौकार नव्हे तर उत्तुंग षटकारच ठोकला.
बंगळुरुच्या डावादरम्यान 11 व्या ओव्हरमध्ये बोलिंग मार्कवर क्रुणाल पांड्या आला. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने पुढे सरसावत क्रुणालचा बॉल मैदानाबाहेर भिरकावला. मॅक्सवेलचा हा षटकार 100 मीटर्सचा होता. सलामीच्याच सामन्यात मॅक्सवेलने 100 मीटर्सचा षटकार ठोकला.
क्रुणालच्या बोलिंगवर मॅक्सवेलने मारलेला उत्तुंग षटकार पाहून कोहलीने मजेशीर रिअॅक्शन दिली. त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरुन ‘अरे बापरे एवढा मोठा षटकार ते ही थेट मैदानाच्या बाहेर’, असं विराटला म्हणायचं असावं.
A 100-meter monster from Glenn Maxwell!!!
He sends the ball out of the stadium.
Virat Kohli’s reaction says it all. #IPL2021 #GlennMaxwell #RCBvsMI #MIvRCB #Maxwellpic.twitter.com/npg3DhlcdI
— OneCricket (@OneCricketApp) April 9, 2021
मॅक्सवेल आणि कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 52 रन्सची पार्टनरशीप केली. या पार्टनरशीपने बंगळुरुच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. मॅक्सवेलने 28 चेंडूत 39 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.
आयपीएल 2021 च्या अगोदर ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने रिलीज केलं. ज्यानंतरच्या ऑक्शनमध्ये मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी आरसीबी आणि चेन्नईमध्ये स्पर्धा लागली होती. अखेर आरसीबीने 14.25 कोटी रुपयांना ग्लेन मॅक्सवेवला संघात समाविष्ट करुन घेतलं.
(IPL 2021 Mi vs RCB Virat Kohli reaction Over Glenn Maxwell hit Longest Six)
हे ही वाचा :
IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीला दुखापत, क्रुणाल पांड्याचा बॉल विराटच्या डोळ्यावर