चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) नववा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने शानदार सुरुवात केली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 25 चेंडूत 32 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत प्रत्येकी 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. या 2 सिक्ससह रोहितने विक्रमाला गवसणी घातली आहे. (ipl 2021 mi vs srh rohit sharma became the first Indian batsman to hit the most sixes in the ipl)
रोहित शर्मा या 2 सिक्ससह आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पछाडत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 1 सिक्स लगावला.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आतापर्यंत 351 सिक्स फटकावले आहेत. तर याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मिस्टर 360 अर्थात एबी डीव्हीलयर्सचा क्रमांक आहे. डीव्हीलियर्सने 237 सिक्स ठोकले आहेत. तर त्यानंतर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 216 षटकार मारले आहेत.
ख्रिस गेल (351)
एबी डीव्हीलियर्स (237)
रोहित शर्मा (217)
एम एस धोनी (216)
कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने एका खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. न्यूझीलंडचा वेगवागन गोलंदाज एडम मिल्नला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचं हे डेब्यू ठरला आहे. रोहितने एडमला मुंबईची कॅप देत त्याचं स्वागत केलं.
या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. मुंबईत 1 बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मार्को यानसनच्या जागी एडम मिल्नला संधी दिली आहे. तर हैदराबादने एकूण 4 बदल केले आहेत. संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह, खलील अहमद आणि मुजीब उर रहमानला संधी देण्यात आली आहे. विराट सिंहचं यानिमित्ताने पदार्पण ठरलं आहे. तर मुजीबचा हैदराबादसाठीचा पहिलाच सामनाआहे.
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरान पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चहर, ऐडम मिल्न, ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
डेव्हीड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरेस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, विजय शंकर, विराट सिंह, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मुजीब-उर-रहमान
संबंधित बातम्या :
(ipl 2021 mi vs srh rohit sharma became the first Indian batsman to hit the most sixes in the ipl)