मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यंदाच्या आयपीएल मोसमानंतर क्रिकेटला कायमचा गुडबाय करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आयपीएलचं रण (IPL 2021) सज्ज असताना या चर्चांनी जोर धरलाय. यापाठीमागे काही समीकरणे असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच ही समीकरणं खोडून काढणारे नवीन दावेही केले जात आहे. (IPL 2021 MS Dhoni Last Season For Chennai Super Kings, What Dhoni had said last year)
यंदाचा आयपीएल हंगाम MS धोनीसाठी शेवटचा असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचं कारण आहे 2022 साली आयपीएलचं मेगा ऑक्शन… पुढील वर्षी या स्पर्धेत एक नवीन संघ दाखल केला जाईल. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंवर लिलाव लागेल. आत्ता संघासोबत असणाऱ्या काही खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर उर्वरित बोली लावण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की सर्व संघांची रचना बदलली जाईल.
आतापर्यंत धोनीच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यास तो संघावर ओझं ठरण्याचं निमित्त शोधणार नाही. कारण त्याला संघात कायम ठेवल्यास सीएसकेला त्यांच्या बजेटचा मोठा पैसा खर्च करावा लागतो. मग संघात ठेवल्यानंतरी तो किती वर्षे खेळेल असा प्रश्न आहे. ही सगळी अनिश्चितता पाहता पुढील हंगामात धोनी फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता नाही.
पाठीमागच्या आयपीएल मोसमात सीएसकेची कामगिरी अतिशय निराशजनक झाली. बाद फेरीच्या अगोदरच त्यांना आयपीएलमधील आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर डैनी म़ॉरिसन यांनी एम धोनीला हा तुझा शेवटचा आयपीएल हंगाम आहे का?, असं विचारल्यानंतर डेफिनेटली नॉट, असं आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेलं उत्तर धोनीने दिलं होतं.
आयपीएल 2020 मध्ये महेंद्रसिंग धोनीची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. त्याला 14 सामन्यात 200 धावा करता आल्या. नाबाद 47 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. संपूर्ण स्पर्धेत त्याला सात षटकार मारता आले. त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकीर्दीतील हा सिझन सर्वांत खराब होता.
(IPL 2021 MS Dhoni Last Season For Chennai Super Kings, What Dhoni had said last year)
हे ही वाचा :
IPL 2021 : ‘कॅप्टन माही’चा धडाकेबाज अवतार, सराव करताना एका हाताने षटकार, व्हिडीओ व्हायरल
IPL 2021 : आयपीएलमधील सर्वोत्तम 6 इनिंग्स कोणत्या? ज्यामध्ये झाली चौकार-षटकारांची लयलूट!