मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या वेळापत्रकाची (IPL 2021 Schedule) घोषणा करण्यात आली आहे. 9 एप्रिलपासून या मोसमातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. साखळी फेरीत एकूण 56 सामने खेळवण्यात येणार आहे. देशातील विविध 6 शहरात या साखळी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या पर्वातील पहिला सामना 9 मार्चला गत विजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात चेन्नईत पार पडणार आहेत. या निमित्ताने आपण मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत. (ipl 2021 mumbai indians matches Schedule For Ipl 14th season)
Mark your calendars. #IPL2021 is here. ?
First challenge: #MIvRCB ⚔️#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/UXHFYtoJp0
— Mumbai Indians (@mipaltan) March 7, 2021
मुंबई या मोसमातील सलामीचा सामना बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. तर साखळी फेरीतील अखेरचा सामना गत मोसमात उपविजेत्या ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार आहे. दिल्ली विरुद्धचा सामना हा 23 मे ला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्याचं आयोजन कोलकातात करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मोसमात एकही संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार नाहीये. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या टीमला होम ग्राऊंडवर चिअरअप करता येणार नाही.
Mumbai Indians fixtures:
April 9 – RCB
April 13 – KKR
April 17 – SRH
April 20 – DC
April 23 – PK
April 29 – RR
May 1 – CSK
May 4 – SRH
May 8 – RR
May 10 – KKR
May 13 – PK
May 16 – CSK
May 20 – RCB
May 23 – DC#IPL2021 pic.twitter.com/ZIwJYfZLkS— Wisden India (@WisdenIndia) March 7, 2021
9 एप्रिल, विरुद्ध बंगळुरु, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, चेन्नई.
13 एप्रिल, विरुद्ध कोलकाता, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, चेन्नई.
17 एप्रिल, विरुद्ध हैदराबाद, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, चेन्नई.
20 एप्रिल, विरुद्ध दिल्ली, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, चेन्नई.
23 एप्रिल, विरुद्ध पंजाब, संध्याकाळी 7. 30 मिनिटांनी, चेन्नई.
29 एप्रिल, विरुद्ध राजस्थान, दुपारी 3.30 वाजता, दिल्ली.
1 मे, विरुद्ध चेन्नई, संध्याकाळी 7. 30 वाजता, दिल्ली.
4 मे, विरुद्ध हैदराबाद, संध्याकाळी 7. 30 वाजता, दिल्ली.
8 मे, विरुद्ध राजस्थान, 7. 30 वाजता, दिल्ली.
10 मे, विरुद्ध कोलकाता, 7. 30 वाजता, बंगळुरु.
13 मे, विरुद्ध पंजाब, दुपारी 3.30 वाजता, बंगळुरु.
16 मे, विरुद्ध चेन्नई, 7. 30 वाजता, बंगळुरु.
20 मे, विरुद्ध बंगळुरु, 7. 30 वाजता, कोलकाता.
23 मे, विरुद्ध दिल्ली, दुपारी 3.30 वाजता, कोलकाता.
मुंबई इंडियन्सने या मोसमात लिलावातून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. अर्जुनने आतापर्यंत विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे आता अर्जुन या मोसमात कशी कामगिरी करणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
रोहित आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. रोहित 2013 पासून म्हणजेच गेल्या 8 मोसमांपासून मुंबईचे नेतृत्व करतोय. यामध्ये त्याने मुंबईला 8 पैकी 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित कॅपटन्सीसोबत एक अफलातून फलंदाजदेखील आहे.
अशी आहे मुंबईची टीम : रोहित शर्मा (कर्णधार) , क्विंटन डीकॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ख्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय, इशान किशन, अॅडम मिल्न, नॅथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, युद्धवीर चरक, मार्को जॅनसन, जेमी निशाम आणि अर्जुन तेंडुलकर
संबंधित बातम्या :
IPL 2021 Time Table | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार
(ipl 2021 mumbai indians matches Schedule For Ipl 14th season)