मुंबई : कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) अर्ध्या टप्प्यात स्थगित करावा लागला. पर्व स्थगित केलं तेव्हापर्यंत एकूण 60 पैकी 29 सामने पूर्ण झाले होते. मात्र आता स्पर्धा स्थगित झालीये. यामुळे प्रत्येक फ्रँचायजी आपल्या ताफ्यातील खेळाडूंना सुखरुप मायदेशी पाठवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला या फ्रँचायजी आपल्या सोशल मीडियावर ड्रेसिंग रुम तसेच मैदानातील खेळाडूंचे काही विनोदी व्हिडीओ शेअर करत आहेत. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) असाच एक व्हिडीओ शेअर केलाय. (ipl 2021 mumbai indians suryakumar yadav played with drone camera in ground)
पलटणने सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) ड्रोन कॅमेरासोबत पकडा-पकडी खेळतानाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा एकूण 5o सेकंदांचा व्हिडीओ आहे. यात सूर्यकुमार ड्रोन कॅमेरासोबत धर पकड करताना दिसतोय. व्हिडीओत ड्रोन सूर्याचा पाठलाग करतोय. तर त्यानंतर सूर्याही त्या ड्रोनला धरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. मुंबई इंडियन्सने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलेला दिसतोय.
How about a game of pakda-pakdi between SKY and a drone? ?#OneFamily #MumbaiIndians #MI #KhelTakaTak @surya_14kumar @MXTakaTak MI TV pic.twitter.com/Azk84J3I5x
— Mumbai Indians (@mipaltan) May 8, 2021
सूर्याने या 14 व्या मोसमात 7 सामने खेळला. यामध्ये त्याला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 7 मॅचमध्ये 24.71च्या एव्हरेज आणि 144.16 च्या स्ट्राईक रेटने 173 रन्स केल्या. 56 धावा ही त्याची या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
मुंबईने या हंगामातील 7 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवला. तर 3 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने 8 गुणांसब पॉइंट्सटेबलमध्ये 4 थ्या क्रमांकावर आहे.
मुंबईसाठी चेन्नई विरुद्धची मॅच ही मोसमातील अखेरची मॅच ठरली. या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईने शानदार विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत मुंबईला 219 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत धमाकेदार विजय मिळवला. कायरन पोलार्ड या विजयाचा शिल्पकार ठरला. पोलार्डने 34 चेंडूत 87 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली होती. त्याच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक विजयी धावांचा पाठलाग केला.
कोरोनामुळे उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन कुठे केले जाणार, असा प्रश्न सर्वच चाहत्यांना पडला आहे. या सामन्यांचे आयोजन कुठं करायचं याबाबत मोठं आव्हान बीसीसीआयसमोर आहे. हे उर्वरित सामने खेळवण्यासाठी यूएई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा श्रीलंका या 4 देशांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे 4 पैकी कोणत्या ठिकाणी उर्वरित सामने खेळवले जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 mumbai indians suryakumar yadav played with drone camera in ground)