नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आज (1 मे) हायव्होल्टेज लढत होणार आहे. या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium) सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ तोडीस तोड आणि यशस्वी आहेत, तितकेट कडवट प्रतिस्पर्धीदेखील आहेत त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (IPL 2021 Mumbai Indians vs Chennai Super Kings Head to Head records)
उभय संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 30 वेळा भिडले आहेत. यामध्ये मुंबईचा संघ वरचढ राहिला आहे. मुंबईने आतापर्यंत 18 सामन्यात चेन्नईविरोधात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 12 सामन्यात मुंबईवर मात केली आहे. दोन्ही संघांची मागील 5 सामन्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा संघ चेन्नईवर वरचढ राहिला आहे. मुंबईने मागील 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
2008 – चेन्नई, मुंबई
2009 – मुंबई, चेन्नई
2010 – मुंबई, चेन्नई, चेन्नई
2011 – मुंबई
2012 – मुंबई, मुंबई, चेन्नई
2013 – मुंबई, मुंबई, चेन्नई, मुंबई
2014 – चेन्नई, चेन्नई, चेन्नई
2015 – चेन्नई, मुंबई, मुंबई, मुंबई
2018 – चेन्नई, मुंबई
2019 – मुंबई, मुंबई, मुंबई
2020 – चेन्नई, मुंबई
मुंबई : 27.1
चेन्नई : 24.5
मुंबई : 2 वेळा
चेन्नई : एकदा
मुंबई : एकदा
चेन्नई : 4 वेळा
मुंबई : 196
चेन्नई : 161
मुंबई – 9 वेळा प्लेऑफसाठी पात्र
चेन्नई – 10 वेळा प्लेऑफसाठी पात्र
मुंबई – 6 वेळा अंतिम फेरी
चेन्नई – 8 वेळा अंतिम फेरी
मुंबई – 5
चेन्नई – 3
या दोन्ही संघांचा 14 व्या मोसमातील हा 7 वा सामना आहे. तसेच दोन्ही संघ या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने उभे ठाकले आहेत. चेन्नईने 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई 10 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तर मुंबईने 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई 6 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.
चेन्नईसाठी गेला 13 वा मोसम निराशाजनक राहिला. मात्र या मोसमात चेन्नई शानदार कामगिरी करतेय. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस चांगली फलंदाजी करतायेत. ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाही चांगल्या फॉर्मात आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा तिनही आघाड्यांवर अफलातून कामगिरी करतोय. जाडेजा आपली भूमिका चोखपणे पार पाडतोय. वेगवान गोलंदाज दीपक चाहरही दमदार बोलिंग करतोय. त्यामुळे चेन्नई चांगल्या स्थितीत आहे.
मोसमाच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स धावांसाठी आणि विकेट्साठी चाचपडताना दिसतेय. मुंबईची फलंदाजी 2, 3 जणांवर अवलंबून आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक चांगली फलंदाजी करतायेत. पण मीडल ऑर्डर सुरुवातीपासून अपयशी ठरतंय. इशान किशनला वांरवार संधी देण्यात आली. मात्र त्यानंतर त्याला वगळण्यात आले. पंड्या बंधूंना आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तर बोलिंगची जबाबदारी बुमराह आणि ट्रेन्ट बोल्टच्या खांद्यावर आहे. यामुळे या सामन्यात मुंबई बाजी मारणार की चेन्नई विजयाचा रथ कायम ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
(IPL 2021 Mumbai Indians vs Chennai Super Kings Head to Head records)