चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर (Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad) 13 रन्सने मात केली. या विजयाबरोबरच मुंबईने सलग दोन सामने जिंकत गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर स्थान मिळवलं. मुंबई-हैदराबादमध्ये अगदी 40 ओव्हर्सचा खेळ पार पडला. पण यातल्या 2 बॉलवरच सामन्याचा निकाल लागला. आणि ते बॉल होते भुवनेश्वर कुमारने फेकलेले, अखेरच्या ओव्हरमधील 5 वा आणि 6 वा बॉल… ज्या बॉलवर पांड्याने 2 उत्तुंग षटकार लगावले..! (IPL 2021 Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Vijay Shankar Drops Pollard Catch)
18 व्या षटकात मुंबईची धावसंख्या 126 धावांवर चार विकेटअशी होती. पोलार्ड 14 चेंडूंत 14 आणि हार्दिक पांड्या 4 चेंडूत 7 धावांवर खेळपट्टीवर होते. दोघांनाही मोठे शॉट्स शॉट्स खेळण्यात अडचण येत होती. अशा परिस्थितीत खलील अहमद त्याची शेवटची ओव्हर टाकायला आला. तोपर्यंत त्याने तीन षटकांत केवळ 17 धावा दिल्या होत्या.
खलीलच्या पहिल्याच बॉलवर पोलार्डने खणखणीत चौकार लगावला. दुसऱ्या बॉलवर खलीलने पोलार्डला चकवलं. तिसऱ्या बॉलवर पोलार्डने जोराचा शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तो बॉल मैदानाच्या बाहेर न जाता विजय शंकरच्या हाती गेला. पण पोलार्डच्या सुदैवाने विजय शंकरने त्याचा सोपा झेल सोडला आणि तिथेच मॅच फिरली…
भुवीने पहिले चार चेंडू अत्यंत कमालीचे आणि शिताफीने टाकले. ज्या चेंडूवर पोलार्डला मोठे फटके खेळता आले नाहीत. परंतु भुवीच्या अखेरच्या दोन बॉलवर पोलार्डने कमाल केली. त्याने भुवीचा पहिला चेंडू लॉन्ग ऑनच्या डोक्यावरुन मारला तर दुसरा चेंडू लॉन्ग ऑनच्या उजव्या साईडला अत्यंत ताकदीने मारला. शेवटच्या ओव्हरमध्ये पोलार्डच्या 2 खणखणीत षटकारांनी मुंबईने 150 धावांचा टप्पा गाठला.
खरं तर याच दोन षटकारांनी मुंबईला मॅचमध्ये जिवंत ठेवलं. जर पोलार्डच्या बॅटमधून ते दोन षटकार निघाले नसते तर मुंबईच्या 135 ते 140 धावा झाल्या असत्या. हैदराबादला हे लक्ष्य तितकंस कठीण गेलं नसतं. साहजिक त्याच दोन षटकारांनी मुंबईचं नशीब पालटलं आणि मुंबईने 13 रन्सने हैदराबादला हरवलं.
इंडियन प्रीमियर लीगमधील आज नववा सामना आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने हैदराबादसमोर 151 धावांचं माफक आव्हान उभं केलं होतं. परंतु मुंबईने दिलेलं हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवलं नाही. हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अवघ्या 22 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी केली. सोबत कर्धणार डेव्हिड वॉर्नरने 36 धावांचे योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हैदराबादच्या कोणत्याही फलंदांजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. परिणामी हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
दुसरीकडे हैदराबादवर मात करत मुंबईने गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. आजच्या सामन्यात मुबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत 150 धावांचा बचाव केला. मुंबईकडून राहुल चाहरने 4 षटकात 19 धावा देत 3 तर ट्रेंट बोल्टने 3.4 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. बुमराह आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर हार्दिक पंड्याने हैदराबादच्या दोन फलंदाजांना धावबाद केलं.
(IPL 2021 Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Vijay Shankar Drops Pollard Catch)
हे ही वाचा :
MI vs SRH, IPL 2021 Match 9 Result | हैदराबादचा सलग तिसरा पराभव, मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय