मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील (IPL 2021) 8 वा सामना आज (16 मार्च) खेळण्यात येणार आहे. या सामन्यात 2 किंग्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना पंजाब किंग्स punjab kings विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (mahendra singh dhoni) इतिहास रचणार आहे. धोनी पंजाब विरुद्ध द्विशतक झळकावणार आहे. धोनीला हे द्विशतक लगावण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. (ipl 2021 pbks vs csk chennai super kings captain mahendra singh dhoni play his 200th match for Chennai against punjab kings)
धोनी पंजाब विरुद्ध धावांच द्विशतक नाही तर सामन्याचं द्विशतक लगावणार आहे. पंजाब विरुद्धचा हा सामना चेन्नईसाठीचा धोनीचा 200 वा सामना असणार आहे. त्यामुळे धोनीचं या सामन्यासाठी मैदानात उतरताच हे अनोखं द्विशतक पूर्ण होणार आहे.
धोनीने आतापर्यंत 199 सामन्यात चेन्नईचे नेतृतव केलं आहे. या 199 सामन्यांमध्ये 24 सामने हे चॅम्पियन्स लीगमधील आहेत. धोनीने या एकूण 199 मॅचेसमध्ये 138.80 च्या स्ट्राईक रेटने 22 अर्धशतकांसह 4 हजार 507 धावा केल्या आहेत. यात त्याने 308 चौकार आणि 212 सिक्स लगावले आहेत. धोनीची 84 ही आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. धोनी आयपीएलमध्ये रोहित शर्मानंतरचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. तसेच धोनी आयपीएलमध्ये यशस्वी फलंदाज राहिला आहे. धोनी आणि चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम हा निराशाजनक राहिला. चेन्नईने गतमोसमात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. तसेच या 14 व्या पर्वाचीही सुरुवात पराभवाने झाली.
या मोसमातील दुसरा सामना पंजाब विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून 14 व्या पर्वातील पहिला विजय साकारण्याचा प्रयत्न चेन्नईचा असणार आहे. त्यामुळे धोनीकडून चेन्नईसाठीच्या 200 व्या सामन्यात विशेष आणि अफलातून कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर) , इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 pbks vs csk chennai super kings captain mahendra singh dhoni play his 200th match for Chennai against punjab kings)