मुंबई : पंजाब किंग्जचा (Punjab Kings) आक्रमक बॅट्समन दीपक हुडाने (Dipak Hooda) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) वादळी खेळी केली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दीपकने मुनमुराद फटकेबाजी केली. त्याने केवळ 24 चेंडूत 64 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत त्याने 4 चौकार तर गगनचुंबी 6 षटकार लगावले. इकीकडे दीपकने धडाकेबाज अर्धशतक ठोकलं तर दुसरीकडे त्याच वेळी हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) मोठा भाऊ कृणाल पांड्या (Krunal Pandya) सोशल मीडियावर ट्रोल झाला. क्रुणालच्या ट्रोल होण्याला दीपक हुडा आणि त्याच्या दरम्यानच्या वादाची पार्श्वभूमी आहे. (IPL 2021 PBKS vs KKR Dipak Hooda Fastest Fifty krunal pandya Troll)
कृणाल पांड्या आणि दीपक हुडा बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतात. नुकतीच सय्यद अली मुश्ताक ट्रॉफी पार पडली. या स्पर्धेदरम्यान कृणाल आणि दीपकमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. हे भांडणं एवढ्या टोकाला गेलं की दीपक हुडाने ही स्पर्धा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. याच प्रकरणामुळे बडोदा क्रिकेट संघाने दीपकवर कारवाई केली होती.
बडोदा क्रिकेट असोसिएशनने दीपक हुडाच्या खेळण्यावर एका वर्षाची बंदी घातली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कृणाल पांड्याच्या खांद्यावर बडोद्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. कर्णधार असताना त्याने दीपकला शिवीगाळ केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच कारणामुळे दीपकने त्याच्याबरोबर न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयानंतर बडोदा क्रिकेट असोसिएशनने दीपक हुडावर कारवाई केली.
कृणाल पांड्यामुळेच दीपक हुडावर कारवाई झाली, असा आरोप करत दीपकच्या वादळी खेळीनंतर नेटकऱ्यांनी क्रुणालला निशाण्यावर धरलं. अनेक नेटकरी यावेळी कृणालच्या विरोधात ट्विट करत होते. तर अनेकांनी दीपकची तारीफ करताना कृणालची फिरकी घेत त्याला चिमटे काढले.
Krunal Pandya watching Hooda’s inning:- pic.twitter.com/3enu3U9WRs
— 々TANGENT々 TeamVadaPaav ✨ (@pra_tea_k) April 12, 2021
Krunal Pandya after seeing Hooda batting like this*#RRvsPBKS #PunjabKings pic.twitter.com/OUnCanJd2E
— Aman Jha (@ironical_aman) April 12, 2021
Krunal Pandya watching Deepak Hooda bat from his hotel room.#RRvPBKS pic.twitter.com/mF4t2sVrnD
— Pratham Naik (@pratham337) April 12, 2021
निकोलस पुरनला पाठीमागे ठेऊन पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने आणि कर्णधार के.एल. राहुलने दीपक हुडाला फलंदाजीसाठी वरच्या क्रमाकांवर खेळण्याची संधी दिली. त्या संधीचं दीपकने सोनं नाही तर हिरे-मोती केले.
दीपकने केवळ 20 चेंडूत दणदणीत अर्धशतक ठोकलं. पळून धावा काढण्याऐवजी त्याने चौकार षटकार मारणं पसंत केलं. त्याच्या खेळीत त्याने उत्तुंग 6 षटकार खेचले. तसंच चार उत्तम आणि क्लासिक चौकार मारले. त्याच्या 28 चेंडूतल्या 64 धावांच्या खेळीने पंजाबला धावांचा डोंगर उभारता आला.
(IPL 2021 PBKS vs KKR Dipak Hooda Fastest Fifty krunal pandya Troll)
हे ही वाचा :
IPL 2021 : ‘संजू…. तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’, मॉरिसच्या प्रश्नावर सॅमसनचं खास उत्तर