मुंबई : पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) फलंदाजांनी कोलकात्याच्या (Kolkata Knight Riders) गोलंदाजीसमोर नांगी टाकली. सोमवारी पुन्हा एकदा पंजाबचे फलंदाज सपशेल ठरले. कोलकात्याविरुद्ध पंजाबचा संघ शंभरीही पार करणार नाही असं वाटत असताना ख्रिस जॉर्डनने (Chris Jorden) पंजाबची लाज राखली. शेवटच्या तीन षटकांत त्याने फटकेबाजी करत पंजाबच्या धावफलकावर त्याने 123 धावा लावल्या. दरम्यान पंजाबकडे तगडे फलंदाज असताना देखील ते मोठी धावसंख्या उभारु शकत नाही, याचं शल्य क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये आहे. मात्र, कालच्या सामन्यात फॅन्सच्या निशाण्यावर आला पंजाबचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul)… त्याच्या फलंदाजीतल्या अपयशाने फॅन्स त्रस्त आहेत. अखेर याला संघाबाहेर ठेवलं पाहिजे, अशी मागणी काही फॅन्सनी ट्विटरवरुन केली आहे. एकाने तर थेट राहुलला पाणी द्यायला ठेवलं पाहिजे, असंच म्हटलं. (IPL 2021 PBKS vs KKR KL Rahul Flop Show Against KKR Fans Troll Social Media)
के एल राहुलचा फ्लॉप परफॉर्मन्स सोमवारच्या सामन्यातही त्याने कायम ठेवला. कोलकाताविरुद्ध तो डावाची सुरुवात करायला मैदानात उतरला. 20 चेंडूंचा सामना करताना त्याने केवळ 19 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. आज मोठी खेळी करेल असं वाटत असताना पॅट कमिन्सच्या बोलिंगवर त्याने सुनील नरेनला सोपा कॅच दिला आणि तंबूत परतला.
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात के एल राहुल अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियावर त्याला पंजाबच्या फॅन्सनी ट्रोल केलं. राहुलला संघात 12 वा प्लेअर म्हणून ठेवलं पाहिजे, अशी मागणी काहींनी केली तर काहींनी थेट राहुललाउतर खेळाडूंना पाणी देण्यासाठी ठेवा, अशीच मागणी केली.
Klrahul ko 12th man rakho, pani pilane k liye
— Princegulzarsony (@Princegulzarso1) April 26, 2021
This is what happens when ‘Rahul’ plays in ‘Narendra Modi’ Stadium?#IPL2021 #KLRahul pic.twitter.com/FlLFr2dLHP
— ʜᴀʀꜱʜ??™?? (Masked?) (@HarshRo45_) April 26, 2021
KL failed and Punjab collapsing again , Happening nth time since KL joined Punjab . This team needs KL Rahul’s statpadding to even have a remote chances to win the game.
— Aivy (@SpiderPant) April 26, 2021
Ye KL Rahul agar T20 World Cup m khela toh India ki haar pakki samjho
— ?????? ???????? ?? (@SRKsZaynn) April 26, 2021
पंजाबच्या संघात अनेक मोठी नावे आहेत पण मैदानावर प्रदर्शन करण्यात ते सपशेल अपयशी ठरत आहेत. पंजाबकडे सलामीवार म्हणून मयांक अग्रवाल आणि के एल राहुलसारखी तगडी जोडी आहे जी दुनियेतील कोणत्याही गोलंदाजीचा समाचार घेण्यास पात्र आहे. ख्रिस गेलसारखा युनिव्हर्स बॉस आहे की जो काही ओव्हर्समध्ये सामन्याचं चित्र पालटून टाकत होत्याचं नव्हतं करुन ठेवण्याची क्षमता बाळगतो. नंतर निकोलस पूरन सारखा आक्रमक आणि अष्टपैलू खेळाडू आहे जो काहीच बॉलमध्ये झंझावाती खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बोलिंगमध्ये अर्शदीप सिंग, मोहम्मद शमीसारखे बोलर आहेत जे प्रतिस्पर्धी संघांच्या विकेट घेऊन त्यांना घायाळ करु शकतात.
(IPL 2021 PBKS vs KKR KL Rahul Flop Show Against KKR Fans Troll Social Media)
हे ही वाचा :
Video : ख्रिस जॉर्डन नडला, प्रसिद्ध कृष्णा डोळ्यात डोळे घालून भिडला, वाचा मैदानावर नेमकं काय घडलं…?