मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्यात आला. मागील काही दिवसांमध्ये अहमदाबाद आणि नवी दिल्लीत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य पॉझिटिव्ह (Corona Positive) आले. त्यामुळे बीसीसीआयला (Bcci) नाईलाज म्हणून हा मोसम स्थगित करावा लागला. यानंतर बीसीसीआय, फ्रॅंचायजी आणि खेळाडूंनाही आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. तर खेळाडूंच्या मानधनातही कपात होणार आहे. बीसीसीआयला प्रसारण आणि प्रायोजक्तवातून मिळणाऱ्या एकूण रक्कपैकी 2 हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं. तसेच खेळाडूंना वेळेनुसार रक्कम देण्यात येणार आहे. (IPL 2021 postponed due to corona financial loss to players and BCCI)
खेळाडूने स्वत: ला स्पर्धेच्या एखाद्या भागासाठी उपलब्ध ठेवले असेल तर पगार प्रमाणानुसार असेल. म्हणजेच त्या खेळाडूला त्याने खेळलेल्या सामन्यांच्या आधारावर मानधन देण्यात येईल. आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. म्हणजे फ्रँचायजीने एका खेळाडूला 20 लाखात खरेदी केलं. त्या खेळाडूने 7 सामने खेळले असतील तर त्याला 10 लाख रुपये देण्यात येतील. दरम्यान एका अनुभवी खेळाडूने याबाबत प्रतिक्रिया दिली. “हे समीकरण फक्त तेव्हाच लागू होईल जेव्हा एखादा खेळाडू स्वत: हून स्पर्धेच्या काही भागासाठी स्वत: ला मुक्त करेल”, अशी प्रतिक्रिया खेळाडूने दिली. पण आयोजकांनी स्पर्धा स्थगित केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत फ्रँचायजींना त्यांच्या खेळाडूंना निम्मी रक्कम द्यावी लागेल.
“14 वं मोसम मध्येच स्थगित करण्यात आलं. त्यामुळे आम्हाला 2000 ते 2500 कोटी रुपयाचं नुकसान होऊ शकतं. अंदाजे किमान 2200 कोटीचं नुकसान हे निश्चचितच होईल”, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या 52 दिवसांच्या स्पर्धेत एकूण 60 सामने खेळवण्यात येणार आहेत त्यापैकी आतापर्यंत एकूण 24 दिवसांमध्ये 29 सामने निर्विघ्नपणे पार पडले. मात्र त्यानंतर कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली. बीसीसीआला सर्वाधिक नफा हा स्टार स्पोर्ट्सकडून मिळणाऱ्या प्रसारण शुल्कातून होतो. बीसीसीआयने प्रसारणाचे सर्व हक्क हे स्टार स्पोर्ट्सला दिले आहेत.
स्टारने बीसीसीआयसोबत 5 वर्षांच्या प्रसारणाच्या हक्कासाठी 16 हजार 347 कोटी मोजले आहेत. यानुसार स्टार वर्षनिहाय बीसीसीआयला प्रसारण शुल्क म्हणून 3 हजार 269 कोटींपेक्षा अधिक रक्कम देते. या मोसमात एकूण 60 सामने खेळवण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे 29 सामन्यांच यशस्वीरित्या पार पडले. जर सामनानिहाय दर गृहित धरला तर स्टारकडून बीसीसीआयला प्रत्येक मॅचसाठी 54 कोटी 50 लाख रुपये मिळतील. त्यामुळे या 29 सामन्यांनुसार स्टारला बीसीसीआयला 1580 कोटी रुपये द्यावे लागतील. त्यामुळे बीसीसीआयला 1690 कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल.
तसेच वीवो ही मोबाईल कंपनी या स्पर्धेची टायटल स्पॉन्सर आहे. टायटल स्पॉन्सर म्हणून वीवो बीसीसीआयला सत्रनिहाय 440 कोटी रुपये देते. मात्र या स्थगितीमुळे बीसीसीआयला इथेही आर्थिक दंड सहन करावा लागणार आहे.
संबंधित बातम्या :
(IPL 2021 postponed due to corona financial loss to players and BCCI)