अभिनेता रणवीर सिंग अजिंक्य रहाणेच्या भेटीला, भेटीचं कारण काय?

| Updated on: Apr 09, 2021 | 8:09 AM

मुंबईत 'बॉलिवूडचा सिंबा' रणवीर सिंगने (Ranveer Singh) क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) भेट घेतली आहे.

अभिनेता रणवीर सिंग अजिंक्य रहाणेच्या भेटीला, भेटीचं कारण काय?
अजिंक्य रहाणे आणि रणवीर सिंग
Follow us on

मुंबई : आयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम सुरु व्हायला अगदी काहीच तास उरले आहेत. सगळ्या जगभरातील क्रिकेट चाहते त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहत आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Chalengers Banglore) यांच्यात चेन्नईमध्ये सलामीची लढत पार पडणार आहे. बॉलिवूडला देखील आयपीएलची भुरळ आहे. अनेक सिने अभिनेते-अभिनेत्री क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी वेड्या असतात. आयपीएलचा रणसंग्राम सुरु होण्याअगोदर इकडे मुंबईत अभिनेता ‘बॉलिवूडचा सिंबा’ रणवीर सिंगने (Ranveer Singh) क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) भेट घेतली आहे. (IPL 2021 Ranveer Singh meet Delhi Capitals Ajinkya Rahane)

अजिंक्य रहाणे-रणवीर सिंग भेट

मुंबईमधील क्रिकेट मैदानामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अजिंक्य रहाणे यांची भेट झाली. या भेटीची माहिती स्वत: अजिंक्य रहाणेने दिली आहे. तसंच रणवीर सिंग यानेही अजिंक्य रहाणेसोबतचा फोटो शेअर करत भेटीचा तपशील सांगितला आहे.

रणवीरच्या अजिंक्यला शुभेच्छा

अजिंक्य रहाणेला भेटून आल्यानंतर रणवीरने अजिंक्यसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटो ट्विट करत अजिंक्यला आयपीएलसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. ऑल दे बेस्ट फॉर टूर्नामेंट चॅम्प, असं कॅप्शन रणवीरने अजिंक्यसोबतच्या फोटोला दिलं आहे.

सिंबाच्या साथीने अजिंक्यची बॅटिंग

अजिंक्य रहाणे सिंबाबरोबर काही क्षण क्रिकेट खेळला. या भेटीत दोघांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. रहाणेने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर करत, “जेव्हा सिंबा भेटीला येतो तेव्हा क्रिकेट तर खेळायला हवंच ना…” असं म्हटलं आहे.

दिल्लीची सलामीची लढत 10 एप्रिलला

अजिंक्य रहाणेच्या दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी चेन्नईशी पार पडणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. दोन्ही संघ सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. दोन्ही संघांची कसून प्रॅक्टिस सुरु आहे.

(IPL 2021 Ranveer Singh meet Delhi Capitals Ajinkya Rahane)

हे ही वाचा :

दिल्लीच्या योद्ध्यावर शस्त्रक्रिया, ‘मी पुन्हा येईन’, जिगरबाज खेळाडूचा बेडवरुन पुनरागमनासाठी खास मेसेज!

IPL 2021 : मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालणार?, विराट कोहलीकडून RCB च्या युवा बोलर्सचं तोंडभरुन कौतुक

IPL 2021 : मुंबईविरुद्ध पहिलीच मॅच, विराट कोहलीचं मॅचअगोदर ट्विट, संघ पाठीराख्यांना म्हणतो…