मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) आता मोजून काही दिवस शिल्लक आहेत. क्रिकेट टीमसह चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. पण त्याआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये (Royal Challengers Bangalore) मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जोश फिलीपीने (Josh Philippe) या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बंगळुरुला मोठा धक्का लागला आहे. मात्र जोशच्या जागी संघात न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज फिन एलनला (Finn Allen) ताफ्यात घेतलं आहे. फिनला 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून कोणीही खरेदी केलं नव्हतं. त्याची बेस प्राईज 20 लाख इतकी होती. मात्र आता फिलिपीने माघार घेतल्याने फिनला खेळण्याची संधी मिळाली आहे. (ipl 2021 rcb Opportunity for Finn Allen to replace Josh Philippe)
जोश फिलीपीने माघार घेतल्यानं बंगळुरुने ट्विट केलं आहे. फिलीपीने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या जागी एलनला संधी दिली आहे. जोश फिलीपीने 13 व्या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याने 5 सामन्यात 78 धावा केल्या होत्या. तर फिन एलनने न्यूझीलंडसाठी 12 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 अर्धशतक लगावले आहेत. नुकतंच न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश टी 20 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.
Finn Allen replaces Josh Philippe for #IPL2021.
We regret to inform that Josh Philippe has made himself unavailable for IPL 2021 due to personal reasons. As a result, we have picked an exciting top order batsman in Finn Allen.#PlayBold #Classof2021 pic.twitter.com/DaasJ58ngk
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 10, 2021
सुपर स्मॅश टी 20 स्पर्धेत एलनने वेलिंग्टनचे प्रतिनिधित्व केलं होतं. यामध्ये त्याने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने 512 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 अर्धशतक लगावले होते. नाबाद 92 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचा स्ट्राईक रेट हा 193 इतका होता. तसेच एलनने एकूण 56 चौकार आणि 25 उत्तुंग षटकार खेचले होते. एलन या स्पर्धेत, सर्वाधिक धावा, चौकार, षटकार आणि अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला होता. दरम्यान एलन या आयपीएलच्या 14 व्या मोसमात कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
अशी आहे बंगळुरु टीम : विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, जोश फिलिप, एबी डिव्हीलियर्स, डॅनियल सॅम्स, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, देवदत्त पडिक्कल, पवन देशपांडे, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, अॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन, कायले जॅमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टियन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, केएस भरत आणि सुयश प्रभुदेसाई.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 rcb Opportunity for Finn Allen to replace Josh Philippe)