IPL 2021 : ‘शाब्बास रं वाघा’, बंगळुरुचं कंबरडं मोडणाऱ्या हरप्रीतच्या पाठीवर विराटची कौतुकाची थाप!

| Updated on: May 01, 2021 | 12:53 PM

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात हरप्रीत ब्रारने एबी आणि मॅक्सवेलच्या विकेटबरोबर विराट कोहलीची विकेटही घेतली. सामन्यानंतर विराटने हरप्रीत ब्रारची भेट घेतली. विराटने आधी हरप्रीतशी हातमिळवणी केली आणि नंतर खांद्यावर हात ठेवून त्याचं तोंडभरुन कौतुक केले. (IPL 2021 RCB vs PBKS Virat kohli Meet harpreet Brar After Match)

IPL 2021 : शाब्बास रं वाघा, बंगळुरुचं कंबरडं मोडणाऱ्या हरप्रीतच्या पाठीवर विराटची कौतुकाची थाप!
विराट कोहलीने आधी हरप्रीतशी हातमिळवणी केली आणि नंतर खांद्यावर हात ठेवून त्याचं तोंडभरुन कौतुक केले.
Follow us on

मुंबई : पंजाब किंग्सने (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royals Challengers Banglore) 34 धावांनी शानदार विजय मिळवला. पंजाबने बंगळुरुला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. पण पंजाबच्या गोलंदाजांसमोर बंगळुरला20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने (K L Rahul) सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पण पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला हरप्रीत ब्रार. त्याने केवळ 7 बॉलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि बंगळुरुचे आधारस्तंभ एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलला तंबूत धाडलं. त्याने बंगळुरुच्या पाठीचा कणाच मोडून काढला. त्याच्या या मॅचविनिंग परफॉर्मन्सनंतर विराट कोहलीने त्याची भेट घेऊन त्याचं अभिनंदन केलं. (IPL 2021 RCB vs PBKS Virat kohli Meet harpreet Brar After Match)

हरप्रीतच्या पाठीवर विराटची कौतुकाची थाप!

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात हरप्रीत ब्रारने एबी आणि मॅक्सवेलच्या विकेटबरोबर विराट कोहलीची विकेटही घेतली. सामन्यानंतर विराटने हरप्रीत ब्रारची भेट घेतली. विराटच्या आधी हरप्रीतशी हातमिळवणी केली आणि नंतर खांद्यावर हात ठेवून त्याचं तोंडभरुन कौतुक केले. कदाचित हरप्रीत हा क्षण कधीही विसरु शकणार नाही.

विराट पाजीची विकेट माझ्यासाठी खास होती…!

मी आज स्वतला खूप नशीबवान मानतो. माझी आयपीएलमधली पहिली विकेट विराट पाजीची होती. आज मला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. एक बोलर म्हणून कमबॅक करण्याची संधी असते, मी ही तेच केलं. मी मोगा या ठिकाणाहून येतो. तिथले लोक माझ्या आजच्या परफॉर्मन्सने खूश होतील. अशीच कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करेन.

7 चेंडूत दिग्गजांना माघारी धाडलं!

बंगळुरु धावांचा पाठलाग करत असताना हरप्रीत सामन्यातील 11 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हरप्रीतने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. हरप्रीतने विराटला 35 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर पुढील चेंडूवर हरप्रीतने ग्लेन मॅक्सवेलचा काटा काढला. हरप्रीतने मॅक्सवेलला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर 13 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ‘मिस्टर 360’ एबी डी व्हीलियर्सला आऊट केलं. अशा प्रकारे हरप्रीतने आपल्या फिरकीच्या जोरावर बंगळुरुच्या तीन वर्ल्ड क्लास प्लेअर्सला तंबूत धाडलं. हरप्रीतने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 19 धावा 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने 1 मेडन ओव्हर टाकली. तसेच हरप्रीतने शाहबाद अहमदचा सुंदर कॅच घेतला.

कोण आहे हरप्रीत?

हरप्रीतने पंजाबकडून 2019 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. हरप्रीतने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळले आहेत. सोबतच क्लब क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावण्याची कामगिरीही त्याने केली आहे. म्हणजेच हरप्रीतमध्ये बोलिंगसह बॅटिंग करण्याची क्षमता आहे. हरप्रीतने आतापर्यंत 4 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तर 19 टी 20 सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केलं आहे.

(IPL 2021 RCB vs PBKS Virat kohli Meet harpreet Brar After Match)

हे ही वाचा :

IPL 2021 : माझी छाती गर्वाने फुगलीय, माझ्या करियरमध्ये मला जमलं नाही ते ‘पृथ्वी’ने करुन दाखवलं : वीरेंद्र सेहवाग

‘तूने जिंदगी में आके, जिंदगी बदल दी…’ रोहित शर्माच्या वाढदिवशी पत्नी रितीकाची रोमँटिक पोस्ट!

IPL 2021 : आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!