चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) तिसरा सामना डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers hydrabad) आणि ओयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या उभय संघात खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ मागील मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचला होता. त्याच वेळी, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचे जवळजवळ समान गुण होते परंतु नेट रनरेटमुळे कोलकात्याचा संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकला नव्हता. कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 19 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी हैदराबाद संघाने सात विजय मिळवले आहेत तर 12 सामन्यात केकेआरने विजय मिळवलाय. आजही कोलकात्याचं पारडं जड मानलं जात आहे. (IPL 2021 Sunrisers hydrabad vs Kolkata Knight Riders live streaming When And Where To Watch Free in Marathi)
बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसनच्या समावेशाने कोलकात्याचा संघ परिपूर्ण झालाय. तसंच भारताचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू हरभजन सिंग याचा देखील कोलकाता संघात झाला आहे. कोलकाता संघात अगोदरच सुनील नरेन , कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांसारखे स्टार खेळाडू आहेत.
2016 मध्ये हैदराबादने आयपीएलचं जेतेपद मिळवलं होतं तर 2018 मध्ये हैदराबादला उपविजेतेपद मिळालं होतं. सनरायझर्स हैदराबाद संघात भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनानंतर गोलंदाजीला बळकटी मिळाली आहे. संघात याअगोदरच रशीद खान, जेसन होल्डर आणि टी. नटराजन यांचा समावेश आहे.
कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील तिसरा सामना आज 11 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.
कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.
तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या बवेबसाईटला देखील पाहू शकता.
(IPL 2021 Sunrisers hydrabad vs Kolkata Knight Riders live streaming When And Where To Watch Free in Marathi)
हे ही वाचा :
IPL 2021 : आयपीएलच्या पहिल्या दोन मॅचमध्ये भारताचे दोन दिग्गज खेळाडू जखमी, भारताची डोकेदुखी वाढली!