मुंबई : कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. सध्याच्या या वातावरणात मायदेशी कसं परतायचं हे त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे. त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होऊन बसलीय. (IPL 2021 Suspended Which foreign players stuck in India Full List here)
आयपीएल स्पर्धेत विदेशी खेळाडूंचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. आयपीएलच्या 14 व्या पर्वात तर अनेक विदेशी खेळाडूंवर बोली लावली गेली आणि त्यांना आपल्या ताफ्यात सामिल करुन घेतलं गेलं. कोरोनाच्या हाहाकारामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकून पडलेत, आपण पाहूयात…
ओयन मॉर्गन (इंग्लंड)
पॅट कमिन्स आणि बेन कटिंग (ऑस्ट्रेलिया)
शाकिब अल हसन (बांगलादेश)
लॉकी फर्ग्यूसन आणि टीम शेफर्ट (न्यूझीलंड)
ग्लेन मॅक्सवेल आणि डॅनियल सॅम्स (ऑस्ट्रेलिया)
एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
फिन एलेन आणि काइल जमेसिन (न्यूझीलंड)
क्विंटन डि कॉक (दक्षिण आफ्रिका)
नॅथन कुल्टर नाईल आणि ख्रिस लिन (ऑस्ट्रेलिया)
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
मोईन अली आणि सॅम करन (इंग्लंड)
लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका)
मिशेल सँटनर (न्यूझीलंड)
जेसन बेहरनडॉर्फ (ऑस्ट्रेलिया)
मार्कस स्टोइनिस आणि स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्खिया (दक्षिण अफ्रिका)
टॉम कुरन, क्रिस वोक्स आणि सैम बिलिंग्स (इंग्लंड)
राजस्थान रॉयल्स
डेव्हिड मिलर (दक्षिण अफ्रिका)
जोस बटलर, लियाम लिविंगस्टोन (ब्रिटनला रवाना)
मुस्तफिजूर रहमान (बांग्लादेश)
केन विल्यमसन (न्यूझीलंड)
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो (इंग्लंड)
राशिद खान आणि मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान)
(IPL 2021 Suspended Which foreign players stuck in India Full List here)
हे ही वाचा :
PHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित
IPL 2021 ला स्थगिती, खेळाडूंच्या मानधनात कपात, आता कोणाला किती रक्कम मिळणार?
IPL 2021 स्थगित, टी 20 वर्ल्ड कपच्या यजमानपदावरही टांगती तलवार, BCCI ला दुहेरी झटका?