मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bangalore) शनिवारी झालेल्या एकतर्फी आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नऊ गडी राखून सहज विजय मिळवून दिला होता. पहिल्याच चेंडूवर कोहली पुन्हा एकदा ऑफ-स्टंपबाहेर बाद झाला. त्यामुळे आरसीबी केवळ 16.1 षटकात 68 धावांवर बाद झाला. आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासातली ही सहावी सगळ्यात कमी धावसंख्या आहे. हैदराबादला जिंकण्यासाठी फक्त आठ षटके लागली. अभिषेक शर्माने केन विल्यमसन (नाबाद 16) च्या साथीने 28 चेंडूत 47 धावा केल्या. या विजयाने हैदराबादला 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर नेले. तर अजूनही तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा खेळ एक वाईट स्वप्न म्हणून विसरायला हवा. कारण कालच्या सामन्यात सगळ्यांकडून खराब कामगिरी झाली आहे.
An emphatic win for #SRH as they beat #RCB by 9 wickets ??
Splendid performance from Kane & Co. This is one happy group right now ??
They move to No.2 on the points table #TATAIPL | #RCBvSRH | #IPL2022 pic.twitter.com/TocgmvruFL
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
आयपीएल 2022 मध्ये आरसीबीला विराट कोहलीकडून खूप आशा होत्या. कर्णधारपद सोडल्यानंतर या मोसमात विराट फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल, असे सर्वांनाच वाटले होते, मात्र तसे काही घडले नाही. सलग दुसऱ्या सामन्यात विराट गोल्डन डकवर आऊट झाला. हैदराबादविरुद्ध फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट मैदानात आला आणि पहिल्याच चेंडूवर मार्को येन्सनने त्याला बाद केले. या मोसमात कोहलीच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. यापूर्वी लखनौविरुद्धच्या सामन्यातही विराटला खातेही उघडता आले नव्हते. त्यामुळे विराटचे चाहते अत्यंत नाराज आहेत.
विराटचे टीम इंडियासाठी शेवटचे शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेले नाही. विराटच्या चाहत्यांना त्याची मोठी खेळी पाहण्याची आस लागली आहे. प्रत्येक सामन्यात चाहते कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करत स्टेडियमवर जातात, पण त्याची निराशाच होते.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक शतकं झळकावणाऱ्या या खेळाडूवर किती विश्वास व्यक्त करायचा, हे संघ व्यवस्थापन ठरवेल, पण गेल्या काही वर्षांपासून कोहलीची जादू फिकी पडली आहे, हे मात्र खरं.