IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज सामना रंगणार

| Updated on: Apr 25, 2022 | 3:43 PM

आज सगळ्यांची नजर विराट कोहलीवरती असेल. आरसीबीकडे कॅप्टन फॅफ डुप्लेसी, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, आणि शाहबाज अहमद असे खेळाडू आहेत. हे सगळे खेळाडू मोठे शॉट खेळण्यास सक्षम आहेत.

IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज सामना रंगणार
ऑरेंज कॅपमधील टॉप पाच खेळाडू बघितल्यास पहिल्या स्थानी जॉस बटलर कायम आहे.
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – आज पुण्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात रोमाचंक सामना होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघात चांगले खेळाडू असल्याने आजचा सामना कोण जिंकेल याची उत्सुकता क्रिकेटप्रेंमीना लागली आहे. आज सगळ्यांच्या नजरा राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीचा फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler) यांच्यावरती असतील. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने संघ गुणतालिकेत चांगल्या ठिकाणी पोहोचला आहे. आत्तापर्यत जॉस बटलरने तीन शतकं मारली आहेत. रॉयल चॅलेज बॅंगलोर जॉस बटलरला आऊट करण्यासाठी अत्यंत कसोशीने प्रयत्न करेल एवढं मात्र नक्की. विशेष म्हणजे सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीने यंदा त्यांच्या चाहत्यांची निराशा केली आहे. आजच्या मॅचमध्ये त्याचा सूर गवसतोय का हे पाहावे लागेल. रॉयल चॅलेज बॅंगलोर संघाचा मागच्या सामन्यावेळी मानहाणीकारक पराभव झाला होता.

आरसीबी संघाचे हे खेळाडू आहेत खतरनाक

आज सगळ्यांची नजर विराट कोहलीवरती असेल. आरसीबीकडे कॅप्टन फॅफ डुप्लेसी, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, आणि शाहबाज अहमद असे खेळाडू आहेत. हे सगळे खेळाडू मोठे शॉट खेळण्यास सक्षम आहेत. तसेच राजस्थान संघात सुध्दा चांगले गोलंदाज आहेत. दिनेश कार्तिक सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकण्याची क्षमता आहे.

राजस्थानची गोलंदाजी उत्तम

आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली आहे. त्याचा महत्त्वाचा गोलंदाज ट्रेंट बोल्ड आहे. ट्रेंट बोल्डच्या गोलंदाजी विराट कोहलीला अधिक परेशान करते. त्यानंतर प्रसिध्द कृष्णा, रवीचंद्र आश्विन, युजवेंद्र चहल इ्त्यादी चांगले गोलंदाज आहेत. युजवेंद्र चहलने आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात अधिक विकेट घेतल्या आहेत.

Loudspeaker Meeting : ‘अजान’चा भोंगा बंद का होणार नाही? गृहमंत्री वळसे-पाटलांनी कारणांची यादी वाचली, काकड आरती, भजन, यात्रा!

Navneet Rana : नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक, वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही’ फडणवीसांचा आरोप!

Nashik : राऊतांच्या आरोपानंतर भुजबळही म्हणतात, नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार झाला; सद्सदविवेक बुद्धीने काम करण्याचा डोस