मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या सीजनची तयारी सुरु झाली आहे. 404 खेळाडूंची यादी (Player List) तयार झाल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे पाच महत्त्वाचे गोलंदाज लिलावात खरेदी होणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यांना कोण खरेदी करणार याकडे लागले आहे. कारण मागच्या वर्षभरात त्यांनी चांगली खेळी केली आहे. हंगामी लिलाव (Seasonal auction) 23 डिसेंबरला होणार आहे. यावेळी हंगामी लिलावात त्यांना मोठी बोली लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रिस जॉर्डन
इंग्लंड टीमचा स्टार गोलंदाज क्रिस जॉर्डन याला टी20 स्पेशल गोलंदाज म्हटले जात आहे. कारण त्याने ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे अंतिम ओव्हर टाकण्यात क्रिस जॉर्डन अधिक माहिर असल्याचं क्रिकेटच्या विश्लेषकांचं म्हणणं आहे. तो आतापर्यंत 295 मॅच खेळला आहे. त्यामध्ये त्याने 310 विकेट घेतल्या आहेत.
केन रिचर्डसन
टी20 फॉर्मेट केन रिचर्डसन याने चांगली गोलंदाजी केली आहे. ज्यावेळी टीमला विकेटची गरज असते, त्यावेळी केन रिचर्डसन या विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये अधिक महत्त्व आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये 154 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये 200 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला अधिक बोली लागण्याची शक्यता आहे.
एडम जैम्पा
ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाला अधिक बोली लागण्याची शक्यता आहे. टी20 फॉरमॅटमध्ये तो एक चांगला विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये 72 मॅच खेळल्या आहेत. विशेष आतापर्यंत चांगली गोलंदाजी करीत त्याने 82 विकेट घेतल्या आहेत.
दुष्मंता चमीरा
श्रीलंका टीममधील दुष्मंता चमीरा हा गोलंदाज सुध्दा त्याच्या कामगिरीमुळे चांगलाचं चर्चेत आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 52 विकेट घेतल्या आहेत. त्याने श्रीलंका टीम अनेकदा विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्याला सुध्दा अधिक बोली लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जोशुआ लिटल
जोशुआ लिटल या गोलंदाजाने टी20 विश्वचषक स्पर्धेत अधिक नाव कमावलं आहे. आर्यलंड या टीमला लिटलने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याने 26 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 39 विकेट घेतल्या आहेत.