मुंबई : मिस्टर 360 नावाने क्रिकेट जगतात एबी डिविलियर्स ओळखला जातो. एबी डिविलियर्स सध्या आयपीएलमध्ये नाही, तरी त्याच्या नावाची जादू आजही कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एबी डिविलियर्स खेळला आहे. त्यामुळे त्याचं आयपीएमधील पहिलं प्रेम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच आहे. त्यामुळे त्याचं आणि त्याच्या पत्नीचा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच काय तर त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याचं देखील पाहायला मिळालं. एबी डिविलियर्सला तिच्याकडे पाहण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नव्हता. दोघांचा वाद कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवरून झाला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कार्यक्रमात दोघांना आयपीएल 2023 स्पर्धेत कोणत्या संघाला सपोर्ट करता असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा एबी डिविलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नाव घेतलं. डिविलियर्स या संघाकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आरसीबीकडून त्याचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला होता. दुसरीकडे त्याच्या पत्नीने कोलकाता नाइट रायडर्सचं नाव घेतलं.
She is Danielle De Villiers, wife of ABD. She is supporting KKR due to Shahrukh Khan and not his husband’s team RCB.
She said SRK is pure love, this is the craze for SRK ❤️#KKRvsRCB pic.twitter.com/auYJudr1vK
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) April 6, 2023
आयपीएलच्या अधिकृत डिजिटल ब्रॉडकास्टर प्लॅटफॉर्मवर क्विक फायर राउंड दरम्यान हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी एबी डिविलियर्सची पत्नी डॅनियलने केकेआरला सपोर्ट करणअयाचं कारणंही सांगितलं. “केकेआर शाहरुख खानची टीम आहे.” तिचं हे उत्तर ऐकून आरबीसीच्या माजी खेळाडूने सांगितलं की, काय मस्करी करते? त्यानंतर डॅनियल डिविलियर्स सोडून शोमधून निघून गेली.
एबी डिविलियर्सच्या अंदाजानुसार यंदा आयपीएलचा किताब गुजरात टायटन्स जिंकेल. आयपीएल 2022 चा किताब हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनं जिंकला होता. असं असलं तरी या संघात जेतेपद पुन्हा जिंकण्याची ताकद असल्याचं त्याने सांगितलं आहे. “मला मनापासून वाटतं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किताब जिंकावा. मागच्या वर्षीही आमच्याकडे चांगली टीम होती. पण आम्ही हारलो होतो.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सर्वोत्तम Playing XI : फाफ डु प्लेसी (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोड़, हर्षल पटेल, वानिंदु हसारंगा, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड.
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.