दिल्ली | आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरातनं सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघावर 6 गडी आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह गुजरात आयपीएल गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा सलग दुसरा पराभव झाल्याने गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरातनं सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघावर 6 गडी आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला.
गुजरातचा डाव
गुजरातच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेले वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल झटपट बाद झाले. दोघांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला हार्दिक पांड्याही कमाल करू शकला नाही. अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर असलेला विजय शंकर आणि साई सुदर्शन यांनी संघाची बाजू सावरली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर विजय शंकर पायचीत होत बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. साई सुदर्शननं 48 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर डेविड मिलारनं त्याला चांगली साथ दिली. त्याने 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या.
गुजरातच्या आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याननंतर साई सुदर्शनने सावध खेळी केली. त्याने 44 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.
FIFTY for Sai Sudharsan ??
A fine and well composed half-century by the youngster.
Live – https://t.co/9Zy9HcuWS6 #TATAIPL #DCvGT #IPL2023 pic.twitter.com/WaZlpZ3opH
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
दिल्लीनं गुजरातसमोर विजयासाठी 163 धावांंचं आव्हान दिलं आहे. या फॉर्मेटमध्ये ही धावसंख्या तशी कमी असल्याने विकेट्स खूप महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला दोन झटके दिल्यानंतर हार्दिक पांड्याही अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे गुजरातवर दबाव वाढला आहे.
गुजरातचे दोन गोलंदाज झटपट बाद झाले. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल प्रत्येकी 14 धावा करून तंबूत परतले.
Match 7. WICKET! 4.1: Shubman Gill 14(13) b Anrich Nortje, Gujarat Titans 36/2 https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
दिल्ली कॅपिटल्सचा डाव
दिल्ली कॅपिटल्सनं गुजरातसमोर विजयासाठी 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून सलामीला डेविड वॉ़र्नर आणि पृथ्वी शॉ मैदानात उतरले. मात्र दुसऱ्या सामन्यातही पृथ्वी शॉ फ्लॉप ठरला. 5 चेंडूत अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अलझारीने त्याचा झेल घेतला. त्यानतर मिशेल मार्शही चांगली कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद शमीने त्याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या गड्यासाठी डेविड वॉर्नर आणि सरफराज खान यांनी संघाला सावरणारी पार्टनरशिप केली. पण डेविड वॉर्नर अलझारीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि धावसंख्येवर फरक पडला. रिली रोसोही खातं न खोलताच तंबूत परतला. अभिषेक पोरेल आमि सरफराज खाननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अभिषेक राशिद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर सरफराज खान 30 धावा करून तंबूत परतला. अक्षर पटेलनं संघाला सावरेल अशी फटकेबाजी केली. मात्र त्याला तशी साथ मिळाली नाही. अमन खान 8 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने शेवटच्या षटकात चांगली फटकेबाजी केली. मात्र 22 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.
Match 7. WICKET! 16.2: Sarfaraz Khan 30(34) ct Josh Little b Rashid Khan, Delhi Capitals 130/6 https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
Match 7. WICKET! 8.3: Rilee Rossouw 0(1) ct Rahul Tewatia b Alzarri Joseph, Delhi Capitals 67/4 https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
Match 7. WICKET! 8.2: David Warner 37(32) b Alzarri Joseph, Delhi Capitals 67/3 https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
मोहम्मद शमीने दुसरी विकेट घेतली असून त्याने मिचेल मार्शला 4 धावांवर बाद केलं आहे.
Match 7. WICKET! 2.4: Prithvi Shaw 7(5) ct Alzarri Joseph b Mohammad Shami, Delhi Capitals 29/1 https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही सलामी जोडी मैदानात आहे. गुजरात टायटन्सने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
दिल्ली कॅपिटल्स संघातून अभिषेक पोरेल पहिल्यांदाच पदार्पण करणार आहे. त्यामुळे तो कसा खेळतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
Young, talented, and raring to roar in #IPL2023 ?
Have a great game, Abishek ?#YehHaiNayiDilli #DCvGT pic.twitter.com/fYoh5iBv32
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 4, 2023
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन – पृथ्वी शॉ, डेविड वॉ़र्नर, मि. मार्श, एसएन खान, आरआर रोस्सोव, अमन हकिम खान, एआर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, ए नार्त्झे, मुकेश कुमार
गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन – वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेविड मिलार, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अलझारी जोसेफ
Two changes for today, #TitansFAM! Here's your XI for #DCvGT ??#AavaDe | #TATAIPL 2023 pic.twitter.com/KkAuxr605O
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 4, 2023
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
The flip is in our favour, and we’ll bowl first ?
Who will take the most number of wickets for us? Predictions, #AavaDe!#DCvGT | #TATAIPL 2023
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 4, 2023
दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयासाठी दिल्लीचा संघ उत्सुक असेल. तर गुजरात आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यावर भर असेल.