मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती इम्पॅक्ट प्लेयर्सची..आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलमधील हा नियम वेगळा असल्याने क्रीडारसिकांनी प्रचंड उत्सुकता आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात पहिल्यांदा इम्पॅक्ट प्लेयर वापरण्यात आला. त्यानंतर आता एका पाठोपाठ एक अशा इम्पॅक्ट प्लेयर्सची एन्ट्री होत आहे. चेन्नईला पहिला इम्पॅक्ट प्लेयर चांगलाच महागात पडला होता. चेन्नईने तुषार देशपांडेला वापरलं खरं पण तो चांगलाच महागात पडला. पण दिल्ली विरुद्ध खेळताना लखनऊ सुपर जायन्ट्स संघाला इम्पॅक्ट प्लेयर्सची मदत झाली. शेवटच्या चेंडूसाठी लखनऊनं क्रिष्णप्पा गौथमला संधी दिली. त्याने या संधीचं सोन केलं.
शेवटचं षटक चेतन साकारिया टाकत होता. पहिल्या चेंडूवर बदोनीनं एक धाव घेतली. त्यानंतर त्याने कृणाल पांड्याला वाइड बॉल टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव घेत कृणालनं बदोनीला स्ट्राईक दिली. त्यानंतर त्याने पुन्हा एक वाइड चेंडू टाकला. मग सलग दोन चेंडूवर बदोनीने षटकार ठोकले. पाचव्या चेंडूवर झेलबाद होत तंबूत परतला आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून क्रिष्णप्पा आला मग काय त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.
19.5 – Badoni gets out ?
19:6 – Gowtham ?????? Anna finishes it off with a six ?Making the most of the latest rule, the #LSG way ?#LSGvDC | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/uAgLbz2nZj
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 1, 2023
लखनऊ सुपर जायन्ट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (W), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार