मुंबई – हैदराबादनं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेत घोर निराशा केली. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. 20 षटकात 8 गडी गमवून 121 धावा करता आल्या आणि विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं.नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.अखेर हैदराबादचा हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. आता गोलंदाजीत कमाल दाखवण्याची गरज आहे.
हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा धाडसी निर्णय असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली होती. सलामीला अनमोलप्रीत सिंग आणि मयंक अग्रवाल जोडी मैदानात उतरली. पण संघाच्या 21 धावा असताना मयंक अग्रवालच्या रुपाने पहिला धक्का बसला. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारत झेलबाद झाला. मार्कस स्टोइनिसने झेल पकडण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
दुसऱ्या गड्यासाठी अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठीने सावध खेळी केली. पण कृणाल पांड्याने त्याला एलबीडब्ल्यू करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला एडन मार्करामही काही खास करू शकला नाही. कृणाल पांड्याने त्याचा त्रिफळा उडवत शून्यावर तंबूत पाठवलं. त्यानंतर आलेल हॅरी ब्रूक 4 चेंडूत 3 धावा करून रवि बिष्णोईच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला.
राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. मैदानात तग धरून राहिला खरा पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. यश ठाकुरच्या गोलंदाजीवर अमित मिश्राने त्याचा झेल घेतला. त्याने 41 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. उमरान मलिकच्या रुपाने हैदराबादला आठवा धक्का बसला आहे. एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन)- केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन) – मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल रशीद