मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक कामगिरीने झाली. गेल्या सिझनमध्येही मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर म्हणजेच सर्वात तळाशी राहीला होता. त्यामुळे यंदा तरी चांगली कामगिरी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. दुसरीकडे, गेल्या दोन सिझनपासून अर्जुन तेंडुलकराला संधी दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे नवोदीत खेळाडू आपली चमक दाखवत असताना रोहित शर्मा मात्र वरिष्ठ खेळाडूंवर विश्वास दाखवत आहे. पण आता अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवावं लागणार अशीच स्थिती आहे.
काही फलंदाजांचा फॉर्म गेल्याने मुंबईच्या ताफ्यात चिंतेचं वातावरण आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेला मुंबई इंडियन्स संघात आता तशी चमक दिसत नाही. त्यात जोफ्रा आर्जला दुखापत झाल्याने त्याचं खेळणं कठीण आहे. शुक्रवारी सराव करताना आर्चरच्या कोपऱ्याला चेंडू लागला. त्यामुळे आज त्याच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. त्याला दहा दिवस आरामाचा सल्ला देण्यात आला आहे.
आयपीएल 2023 मध्ये समालोचन करणाऱ्या सीएसकेचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी आपल्या युटयूब चॅनेलवर ही माहिती दिली. त्यामुळे त्याचा पर्याय म्हणून अर्जुन तेंडुलकरकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर पदार्पण करेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीसोबत फलंदाजीही करतो.
मुंबईचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. 4 षटकात 8.20 च्या सरासरीने त्याने 33 धावा दिल्या होत्या. पहिल्याच सामन्यात मुंबईला आरसीबीकडून 8 गडी राखून पराभवाची धूळ चाखावी लागली होती.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टिम डेविड, तिलक वर्मा, अरशद खान, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला आणि जेसन बेहरनडॉर्फ.
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.