मुंबई – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. दोन्ही संघांनी अद्याप पर्यंत या स्पर्धेत विजयाची नोंद केलेली नाही. त्यामुळे पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीने सावध सुरुवात केली खरी पण दोन धक्के बसल्यानंतर धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरकली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऋतिक शोकिनच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नरचं उजव्या हाताने खेळणं सर्वांना आश्चर्यचकीत करून गेलं. त्याच्या या खेळीमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यापूर्वी डेविड वॉर्नर उजव्या हाताने फलंदाजी करताना दिसला होता. त्यामुळे तो कसोटीत उजव्या हाताने गोलंदाजी करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र तेव्हा त्याने तसं काही केलं नाही. मात्र त्याने हा प्रयोग आयपीएलमध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात केला.
दिल्लीकडून डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात आली. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळीने सुरुवात केली. ही जोडी फोडण्यात ऋतिक शोकीनला यश आलं. पृथ्वी शॉ त्याच्या गोलंदाजीवर 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे जोडी मैदानात चांगली जमली. त्यानंतर ऋतिकने आठव्या षटकातील तिसरा चेंडू मनिष पांडेला नो टाकला त्यावर फ्री हीट मिळाला. मात्र एक रन काढल्याने डेविड वॉर्नरला स्ट्राईक मिळाला.
#MIvsDC #DCvMI
Warner batted as a right-hander during the free hit.pic.twitter.com/Qtd4MsmWSb— ?⭐? (@superking1815) April 11, 2023
डेेविड वॉर्नरने डावखुरा पद्धतीने फलंदाजी करण्याऐवजी उजव्या हाताने गोलंदाजीला सामोरा गेला. यामुळे मैदानात उपस्थित खेळाडूंसह समालोचकांना सुद्धा प्रश्न पडला नेमकं डेविड वॉर्नरला झालं तरी काय? पण फ्री हीट असलेला चेंडू वाया गेला. म्हणजेच त्या चेंडूवर षटकार किंवा चौकाराऐवजी एक धावेवर समाधान मानावं लागलं. यावर आता काही मीम्स व्हायरल होत आहेत.
Yes it is a regular feature of his nets sessions but David Warner the right-hander at times looks as good as David Warner the left-hander #SLvAus pic.twitter.com/b1b19yQbQm
— Bharat Sundaresan (@beastieboy07) June 26, 2022
David Warner!#IPL2023 #DCvMI pic.twitter.com/BlqWMDeBbs
— RVCJ Media (@RVCJ_FB) April 11, 2023
Every year there's one David Warner picture on the pitch that's YouTube thumbnail worthy pic.twitter.com/VrxCpAQQSZ
— Sagar (@sagarcasm) April 11, 2023
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान