IPL 2023 RCB vs KKR : विराट कोहली कोलकात्याविरुद्ध रचणार असे विक्रम, वाचा नेमकं काय करणार

| Updated on: Apr 06, 2023 | 3:29 PM

विराट कोहलीला रनमशिन नावानं संबोधलं जातं. कारण त्याच्या बॅटने तो खोऱ्याने धावा करण्यास सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्येही त्याची बॅट चांगली तळपली आहे. आता कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात काही विक्रमांना गवसणी घालण्याची शक्यता आहे.

1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्पर्धेतील सुरुवात चांगली केली आहे. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली. आता कोलकात्याविरुद्ध ईडन गार्डन मैदानात नवे विक्रम रचण्याच्या तयारीत आहे.  (PHOTO- AP)

2 / 5
विराट कोहलीने 2008 मध्ये आयपीएलमध्ये आगमन केलं होतं. कोलकात्याविरुद्ध त्याचा 225 वा सामना असणार आहे. विराटने 2008 साली पहिला सामना कोलकात्याविरुद्ध एम. चिन्नास्वामी मैदानात खेळला होता. दुसरीकडे, विराट कोहली कॅचचं शतक झळकावण्यापासून 6 झेल दूर आहे. (PHOTO- IPL)

3 / 5
विराट कोहली 11,500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 92 धावा दूर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत टी20 फॉर्मेट एकूण 11408 धावा केल्या आहेत. नुकतंच कोहलीने आयपीएलमध्ये 6700 धावांचा टप्पा गाठला होता. विराटने आयपीएलमध्ये 5 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकावली आहेत.  (PHOTO- IPL)

4 / 5
विराट कोहली याचा उमेश यादवविरुद्ध स्ट्राइक रेट 175 चा आहे. कोहली ईडन गार्डन्सवरील 500-क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून फक्त 29 धावा दूर आहे. कोहलीने T20 क्रिकेटमधील या मैदानावर 471 धावा केल्या आहेत.  (PHOTO- IPL)

5 / 5
विराट कोहली आयपीएलमध्ये 50 हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांची शतके झळकावणारा ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सनंतर बंगळुरूचा माजी कर्णधारही तिसरा फलंदाज ठरला.  (PHOTO- IPL)