IPL 2023 : चेन्नईला पराभवाची धूळ चारल्यानतर शुभमन आणि राशीदनं केला नाटू-नाटू डान्स, Video Viral

| Updated on: Apr 01, 2023 | 8:35 PM

गुजरातनं आयपीएल 2022 जबरदस्त कामगिरी केली होती. पदार्पणातच जेतेपदावर नाव कोरलं होतं. यंदाही गुजरातनं विजयाने स्पर्धेची सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं.

IPL 2023 : चेन्नईला पराभवाची धूळ चारल्यानतर शुभमन आणि राशीदनं केला नाटू-नाटू डान्स, Video Viral
IPL 2023 स्पर्धेत चेन्नईला पराभवाची धूळ चारल्यानतर शुभमन आणि राशीदनं केला नाटू-नाटू डान्स, Video Viral
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सला पराभूत विजयी घोडदौड सुरु केली आहे. सलामीच्या सामन्यातच शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या आक्रमक खेळी पाहायला मिळाल्या. दोघांनी आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केली. पण हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर भारी पडली. गतविजेत्या गुजरात टायटन्सनं या स्पर्धेची सुरुवातही विजयानेच केली. गुजरात संघानं या विजयाचं अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. या विजयानंतर सोशल मीडियावर नाटू नाटू गाण्यावर शुभमन गिल आणि राशिद खानचा डान्स व्हायरल होत आहे.

विजयानंतर शुभमन गिलनं नाटू नाटू गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या गाण्यात शुभमन गिलसोबत राशिद खान आणि विजय शंकर ठेका धरताना दिसत आहेत. डान्ससाठी त्यांनी सध्याचं लोकप्रिय गाणं नाटू नाटू निवडलं आहे. इतकंच काय तर परफेक्ट डान्स स्टेप्सही केल्या आहेत. शुभमनं गिलनं हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की,  मॅच जिंकल्यानंतरचा मूड.

शुभमन गिल सध्या चांगलाच फॉर्मात आहे. ओपनिंगला खेळताना त्याने 65 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यामुळे चेन्नईचा विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला. शुभमन गिलने 36 चेंडूत 63 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सनं प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 178 धावा केल्या. गुजरातनं या धावा 5 गडी गमवत 19.2 षटकात पूर्ण केल्या. गुजरातचा पुढचा सामना 4 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्ससोबत असणार आहे.

गुजरातचे पुढील सामने

  • गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 4 एप्रिल 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स, 9 एप्रिल 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, 13 एप्रिल 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 16 एप्रिल 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स, 22 एप्रिल 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 25 एप्रिल 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स, 29 एप्रिल 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2 मे 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 5 मे 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स, 7 मे 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 12 मे 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध सुपरराईजर्स हैदराबाद, 15 मे 2023
  • गुजरात टायटन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 21 मे 2023

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.