काव्या मारन ही क्रिकेट जगतातील नवं सेन्सेशन बनली आहे. आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स कडून पराभूत झालेल्या हैदराबाद संघाची मालक असलेली काव्या मारनची सध्या इंटरनेटवर, सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. काव्याच्या शहरातच, चेन्नईमध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला पण हैदराबादच्या संघाला दारूण पराभव पत्करावा लागला. हा पराभव काव्याच्या जिव्हारी लागला आणि तिच्या डोळ्यात अश्रूच आले. तिच्या रडण्याचे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि तिचा तो व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तिच्या या व्हिडीओवर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनीदेखील कमेंट्स केल्या. एवढंच नव्हे तर बिग बी यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये काव्या बद्दल लिहीत तिच्याा डोळ्यात अश्रू पाहून वाईट वाटल्याचं नमूद केलं. तेव्हापासून सर्वांनाच काव्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
कुटुंबाची लाडकी लेक
काव्या ही तामिळनाडूच्या एका प्रतिष्ठित आणि प्रभावशाली उद्योगपती व राजकीय कुटुंबातील लाडकी लेक आहे. 6 ऑगस्ट 1992 साली चेन्नईमध्ये तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचं नाव कालानिधि मारन असून ते सन टीव्ही नेटवर्कटे मालक आहेत. सन टीव्ही ही एक मोठी मीडिया कंपनी असून त्याची 33 हून अधिक चॅनेल्स आहेत. मीडियाशिवाय सन समूह हा इतर अनेक क्षेत्रात आहे. 1993 साली सन टीव्हीची सुरूवात झाली. कालानिधि मारन यांचं नेटवर्थ सुमारे तीन बिलियन डॉलर म्हणजे 25 हजार कोटी रुपये आहे.
आईदेखील आहे यशस्वी उद्योगपती
काव्या ची आई कावेरी मारन या एक यशस्वी उद्योगपती आहेत. गेल्या वर्षी (2023) त्यांना बिझनेस टुडे तर्फे मोस्ट पॉवरफुल बिझनेस वुमन चा पुरस्कार मिळाला. त्या सन टीव्ही नेटवर्कच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. सन टीव्ही नेटवर्कचा एकूण रेव्हेन्यू हा 4000 कोटींच्या आसपास आहे. तामिळ, तेलुगू, कन्नड़, मलयालम, बंगाली और मराठी मध्ये सन टीव्हीची अनेक चॅनेल्स आहेत.
तर काव्याचे आजोबा मुरासोली मारन हे डीएमके पक्षतील मोठे नेते होते. अनेक वर्ष ते खासदार होते. काव्याचे काका दायानिधि मारन हे देखील डीएमतकेचे मोठे नेते आहेत.
प्रायव्हसी जपायला आवडते
प्रभावी राजकीय आणि उद्योगपती कुटुंबातील सदस्य असूनही काव्या तिच्या खासगी लाईफबद्दल खूप प्रायव्हसी जपते. ती 32 वर्षांची असून संपूर्ण जग फिरली आहे. मात्र तरीही ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद शिवाय ती ‘साउथ अफ्रीका 20 टूर्नामेंट’ क्रिकेट लीगमधील ‘सनराइजर्स ईस्टर्न केप’ संघाची मालक आहे. काव्या तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर तिचं व्हेरिफाईड अकाऊंट नाही. पण सनरायजर्स हैदराबाद संघाच्या फिशियल ट्विटर अकाउंट वर तिचे संघाशी संवाद साधतानाचे व्हिडीओ आहेत.
सोशल मीडिया किंवा इंटरनेट वर काव्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही. ती सिंगल आहे की नाही, याबद्दलही निश्चित माहिती समोर आलेली नाही. तिला तिचं खासगी आयुष्य खासगीच ठेवायला आवडतं.