IPL Auction 2021 : लिलावापूर्वी कोणत्या संघात किती खेळाडू, किती खेळाडूंची गरज, कुणाकडे किती रक्कम?

| Updated on: Feb 18, 2021 | 12:32 PM

आयपीएलच्या 14 व्या पर्वासाठीचा लिलाव (Ipl Auction 2021) चेन्नईत (Chennai) पार पडणार आहे.

IPL Auction 2021 : लिलावापूर्वी कोणत्या संघात किती खेळाडू, किती खेळाडूंची गरज, कुणाकडे किती रक्कम?
आयपीएलच्या 14 व्या पर्वासाठीचा लिलाव (Ipl Auction 2021) आज चेन्नईत (Chennai) पार पडणार आहे.
Follow us on

चेन्नई | आयपीएलच्या 14 व्या पर्वासाठीचा लिलाव (Ipl Auction 2021) आज चेन्नईत (Chennai) पार पडणार आहे. या लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी 61 खेळाडूंचीच निवड करण्यात येणार आहे. आपल्या ताफ्यात सर्वोत्तम खेळाडू घेण्याचा मानस सर्व फ्रॅंचायजींचा असणार आहे. दरम्यान या 8 फ्रँचायजींकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी काही ठराविक रक्कम आहे. तेवढ्या रक्कमेतच त्यांना खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेता येणार आहे. फ्रँचायजींनी किती रक्कम खर्च करावी, याबाबतचेही काही नियम आहेत. सर्व फ्रँचायजींना त्यांच्याकडे असलेल्या एकूण रक्कमेच्या 75 टक्के रक्कम खर्च करणं बंधनकारक असणार आहे. तसे न केल्यास संबंधित फ्रँचायजीकडे असलेली रक्कम ताब्यात घेतली जाईल. (ipl auction 2021 current position team players details list MI kkr dc csk rr kxi)

तसेच प्रत्येक टीममध्ये जास्तीत जास्त 25 खेळाडूच ठेवता येणार आहेत. यामध्ये कमाल परदेशी 8 खेळाडूच ठेवता येणार आहे. या निमित्ताने कोणत्या फ्रँचायजीकडे किती रक्कम आहे, तसेच त्यांना या लिलावातून किती खेळाडू हवे आहेत, तर आधीपासून किती खेळाडू आहेत. ही आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत.

1) मुंबई इंडियन्स

गत विजेत्या ठरलेल्या मुंबईकडे एकूण 18 खेळाडू आहेत. यामध्ये एकूण 4 विदेशी खेळाडू आहेत. म्हणजेच मुंबईला या लिलावातून एकूण 7 खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. मुंबई त्यापैकी 4 परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेणार आहे.

खेळाडूंची संख्या : 18

परदेशी खेळाडूंची संख्या : 04

शिल्लक खेळाडूंची जागा : 07

परदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 04

मुंबईकडे असलेली रक्कम – 15 कोटी 35 लाख

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्वींटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, सौरभ तिवारी आणि मोहसिन खान

2) दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सकडे ताज्या आकडेवारीनुसार एकूण 17 खेळाडू आहेत. त्यापैकी यामध्ये 5 परदेशी खेळाडू आहेत. तर दिल्ली एकूण 3 खेळाडूंची गरज आहे. दिल्लीकडे एकूण 13 कोटी 4 लाख इतकी रक्कम आहे.

खेळाडूंची संख्या : 17

परदेशी खेळाडूंची संख्या : 5

एकूण शिल्लक जागा : 3

विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 1

शिल्लक रक्कम: 13 कोटी 4 लाख

दिल्ली कॅपिटल्स | श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, एन्रिच नॉर्किए, प्रवीण दुबे आणि ख्रिस वोक्स.

3) सनरायजर्स हैदराबाद

सनरायजर्स हैदराबादने गेल्या मोसमात जोरदार कमबॅक केलं होतं. कॅप्टन डेव्हिड वॉर्नरने शानदार कामगिरी केली होती. हैदराबादकडे या मोसमात एकूण 10 कोटी 75 लाख इतके रुपये आहेत. त्यांच्याकडे एकूण 22 खेळाडू आहेत. त्यांना आणखी 3 खेळाडूंची आवश्यकता आहे.

खेळाडूंचा एकूण आकडा : 22

परदेशी खेळाडूंची संख्या – 7

एकूण किती खेळाडूंची गरज – 03

शिल्लक रक्कम: 10.75 कोटी रुपये

सनरायजर्स हैदराबाद | डेविड वार्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्दार्थ कॉल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धिमान साहा, विराट सिंग, प्रियम गर्ग, मिचेल मार्श, जेसन होल्डर आणि अब्दुल समद.

4) कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाताकडे एकूण 17 खेळाडू आहेत.यामुळे त्यांना आणखी 8 खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. त्यापैकी 2 खेळाडू परदेशी असतील. कोलकाताकडे एकूण 10 कोटी 75 लाख इतकी रक्कम शेष आहे.

टीम कोलतकाता | इयन मॉर्गन (कॅप्टन), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती आणि टिम सेफर्ट.

5) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

बंगळुरुला आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. यामुळे यावेळेस बंगळुरुला तडाखेदार खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. बंगळुरुकडे एकूण आता 14 खेळाडू आहेत. त्यानुसार त्यांना आणखी 11 खेळाडू हवे आहेत. यामध्ये 3 परदेशी खेळाडूंना घेणं बंधनकारक असणार आहे. बंगळुरुकडे एकूण 35 कोटी 40 लाख रुपये आहेत.

बंगळुरुचे खेळाडू | विराट कोहली (कॅप्टन), एबी डिविलियर्स, देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, एडम झम्पा, केन रिचर्ड्सन, डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल.

6) पंजाब किंग्स

किंग्ज्स इलेव्हन पंजाबने आपल्या संघाचं नाव बदलून पंजाब किंग्स असं ठेवलं आहे. तसेच लोगोही बदलला आहे. पंजाबकडे एकूण 3 परदेशींसह 16 खेळाडू आहेत. पंजाबला एकूण 9 खेळाडूंची गरज आहे. त्यांना 4 खेळाडू घ्यावे लागणार आहे. पंजाबकडे सर्वाधिक म्हणजेच 53 कोटी 20 लाख इतकी रक्कम आहे.

पंजाब किंग्स : केएल राहुल (कॅप्टन), अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नलकांडे, हरप्रीत बरार, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुड्डा, इशान पॉरेल, रवि बिश्नोई, ख्रिस जॉर्डन, प्रभसिमरन सिंग

7) राजस्थान रॉयल्स

शिल्पा शेट्टीच्या राजस्थान रॉयल्सकडे एकूण 16 खेळाडू आहेत. त्यानुसार त्यांना 9 खेळाडूंची गरज आहे. त्यापैकी 3 खेळाडू हे परदेशी असतील. राजस्थानकडे असलेली रक्कम ही 15 कोटी 35 लाख इतकी आहे.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, रियान पराग, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, कार्तिक त्यागी, डेविड मिलर, एंड्रयू टाय

8) चेन्नई सुपर किंग्स

मुंबईनंतर आयपीएलमध्ये चेन्नई ही सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम खराब ठरला. त्यामुळे या 14 व्या मोसमात दमदार कामगिरी करण्याचा मानस चेन्नईचा असणार आहे. चेन्नईकडे 7 परदेशी खेळाडूंसह एकूण 19 खेळाडू आहेत. चेन्नईला आणखी 6 प्लेअर्सची आवश्यकता आहे. चेन्नईकडे 19 कोटी 90 लाख इतकी रक्कम आहे.

चेन्नईची टीम : एमएस धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, जोश हेजलवुड, आर साई किशोर, रॉबिन उथप्पा

संबंधित बातम्या :

IPL 2021 Auction Rules | आयपीएलच्या मिनी ऑक्शनदरम्यान सर्व फ्रँचायजींसाठी महत्वाचे 6 नियम

IPL Auction 2021 Live Streaming | लिलाव कधी, कुठे, किती संघ सहभागी, कोणाकडे किती रक्कम?

IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं

(ipl auction 2021 current position team players details list MI kkr dc csk rr kxi)