IPL Auction : पॅट कमिन्स सर्वात महाग खेळाडू, KKR कडून 15.50 कोटींची बोली

| Updated on: Dec 19, 2019 | 10:49 PM

लिलावात एकूण 73 खेळाडूंचा लिलाव होत आहे. यापैकी 29 खेळाडू विदेशी आहेत (IPL Auction). सर्वात जास्त दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात सात खेळाडू आहेत. तर दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात 23 खेळाडू आहे

IPL Auction : पॅट कमिन्स सर्वात महाग खेळाडू, KKR कडून 15.50 कोटींची बोली
Follow us on

IPL Auction LIVE : कोलकाता : IPL 2020 साठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यावेळी लिलावात एकूण 73 खेळाडूंचा लिलाव होत आहे. यापैकी 29 खेळाडू विदेशी आहेत (IPL Auction). सर्वात जास्त दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात सात खेळाडू आहेत. तर दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात 23 खेळाडू आहे (IPL Auction).

अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत 20 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 183 खेळाडू, 40 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 7 खेळाडू आणि 30 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 8 खेळाडूंचा समावेश आहे. जे खेळाडू कसोटी, वनडे आणि टी-20 मधील कुठल्याही प्रकारात आपल्या देशातसाठी खेळले असतील ते कॅप्ड श्रेणीत येतात आणि जे खेळाडू देशाकडून खेळले नसतील ते अनकॅप्ड श्रेणीत येतात.

यावेळी लिलावात अनकॅप्ड खेळाडूंना तीन वेगवेगळ्या बेस प्राईसमध्ये ठेवण्यात आलं आहे. यामध्ये 20 लाख, 30 लाख आणि 40 लाख या तीन श्रेणी आहेत. याआधी या 10 लाख, 20 लाख आणि 30 लाख होत्या. कॅप्ड खेळाडूंसाठी 5 वेगवेगळ्या बेस प्राईस ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये 50 लाख, 75 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि दोन कोटी या श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत.

Live Updates :

[svt-event date=”19/12/2019,5:46PM” class=”svt-cd-green” ] राजस्थान रॉयल्सने रॉबिन उथप्पाला 3 कोटीमध्ये विकत घेतलं.

[svt-event date=”19/12/2019,5:46PM” class=”svt-cd-green” ] सनरायझर्स हैदराबादने विराट सिंहला 1 कोटी 90 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:46PM” class=”svt-cd-green” ] कोलकाता नाईट रायडर्सने राहुल त्रिपाठीला 60 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ] वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलला पंजाबने 8.50 कोटीमध्ये विकत घेतलं.

[svt-event date=”19/12/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ] दिल्ली कॅपिटल्सने अॅलेक्स कॅरीवर 2.40 कोटींची बोली लावली. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ] नॅथन कल्टर नाईलला मुंबई इंडियन्सने 8 कोटीमध्ये विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:38PM” class=”svt-cd-green” ] न्यूझीलंडचा वेगवाग गोलंदाज टिम साउदीवर बोलीच नाही. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:38PM” class=”svt-cd-green” ]
भारताच्या पियूष चावलावर सीएसकेकडून 6.75 कोटींची बोली.

 

[svt-event date=”19/12/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] आतापर्यंत झालेल्या लिलावात पॅट कमिन्स सर्वात महाग खेळाडू ठरला. त्याला केकेआरने 15.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर केकेआरने 15.5 कोटी रुपयांची बोली लावली. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग विदेशी खेळाडू ठरला. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] तीन खेळाडूंना आतापर्यंत 10 कोटी आणि त्यापेक्षा जास्त किंमतीत विकत घेण्यात आलं आहे. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला पंजाबने 10.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] दक्षिण अफ्रिकेचा ऑलराउंडर क्रिस मॉरिसला आरसीबीने 10 कोटीमध्ये विकत घेतलं.

[svt-event date=”19/12/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] लिनला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमतीत विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] चेन्नई सुपर किंग्सने सॅम करणला 5.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] एरॉन फिंचवर आरसीबीने 4.40 कोटी रुपयांची बोली लावली. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] जेसन रॉयला दिल्ली कॅपिटल्सने 1.50 कोटी रुपयांत विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] रॉबिन उथप्पाला राजस्थान रॉयल्सने 3 कोटी रुपयांत विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनवर KKR ने 5.25 कोटींची बोली लावली. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:27PM” class=”svt-cd-green” ] किंग्स इलेवन पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपयांत विकत घेतलं. [/svt-event]

[svt-event date=”19/12/2019,5:27PM” class=”svt-cd-green” ] क्रिस लिनला मुंबई इंडियन्सने 2 कोटी रुपयांत विकत घेतलं. [/svt-event]