IPL 2021 Auction आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने नाव बदललं, आता नशीब बदलणार का?

| Updated on: Feb 17, 2021 | 8:18 PM

किंगज्स इलेव्हन पंजाबने इंस्टांग्रामवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

IPL 2021 Auction आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने नाव बदललं, आता नशीब बदलणार का?
पंजाब संघाची मालक अभिनेत्री प्रिती झिंटा
Follow us on

पंजाब : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील लिलाव प्रक्रियेआधी (IPL 2021 Auction) किंग्ज्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) एक मोठा बदल केला आहे. पंजाबने आपल्या संघाच्या नावात बदल केला आहे. इंस्टाग्रामवरुन पोस्ट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे किंग्जस इलेव्हन पंजाब संघाचं नाव आता पंजाब किंग्स असं (Punjab Kings) असणार आहे. म्हणजेच या आगामी मोसमात पंजाबची टीम नव्या नावासह खेळणार आहे. तसेच पंजाबने या निमित्ताने नव्या लोगोचं अनावरणही केलं आहे. “पंजाब किंग्ज हे आधुनिक नाव आहे. तसेच आता टीमच्या कामगिरीवरही लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे”, असं पंजाबचे सीएओ सतीश मेनन म्हणाले. (ipl franchise kings xi punjab change his name is now punjab kings before ipl auction 2021)

 

 

मेनन नक्की काय म्हणाले?

“ब्रॅडंचं नाव बदललं म्हणजे आम्ही मुल्यांसोबत तडजोड केली असं नाहीये. पंजाबच्या नव्या लोगोतून चैतन्यतेचं दर्शन होतं. तसेच त्यातून नवीन युगाची झलक देखील आहे. या लोगोमुळे आम्ही इतर संघांपेक्षा उजवे ठरतो”, असं मेनन म्हणाले. मोहित बर्मन, नेस वाडिया, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि करण पॉल या आयपीएल फ्रँचायझीचे मालक आहेत.

आतापर्यंत आयपीएलमध्ये अयशस्वी

पंजाबला आयपीएलच्या 13 मोसमात एकदाही विजेतेपद पटकावण्यास यश आलेले नाही. पंजाबने केवळ एकदाच अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर केवळ एकदाच पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. पंजाबने आयपीएलच्या 13 व्या मोसमात युवा केएल राहुलला कर्णधापदाची जबाबदारी दिली होती. केएलने ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. पण त्याला इतर फलंदाजांनी चांगली साथ न दिल्याने साखळी फेरीतच पंजाबचे आव्हान संपुष्टात आले होते. केएल 13 व्या मोसमातील ऑरेन्ज कॅप होल्डर प्लेअर राहिला होता.

कोच आणि कर्णधारांमध्ये बदल

आयपीएलचे जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नातून हा संघ जवळजवळ प्रत्येक मोसमात कर्णधार आणि प्रशिक्षक बदलत असतो. पण यश त्यापासून खूप दूर होतं. युवराज सिंग, कुमार संगकारा, अ‍ॅडम गिलक्रिस्ट, जॉर्ज बेली, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, मुरली विजय, ग्लेन मॅक्सवेल, रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंनी पंजाबचं नेतृत्व केलं आहे. पण यांना आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून देता आलं नाही.

दरम्यान पंजाब संघाचं नाव बदलणारा काही पहिला संघ नाही. दिल्ली कॅपिटल्सन काही वर्षांपूर्वी टीमच्या नावात बदल केला होता. दिल्ली डेयरडेव्हिल्स असं दिल्लीचं आधीचं नाव होतं. तसेच दिल्लीच्या जर्सीचा आधीचा रंग देखील वेगळा होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या जर्सीचा रंग बदलला होता. तर सनरायजर्स संघाचं आधीचं नाव हे डेक्कन चार्जर्स असं होतं. त्यामुळे टीमचं नाव आणि लोगो बदलल्याने आगामी मोसमात नशीब पलटणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान उद्या 18 फेब्रुवारीला आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव कार्यक्रम होणार आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण 292 खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी एकूण 62 खेळाडूंचीच निवड करण्यात येणार आहे.

पंजाबने कायम राखलेले खेळाडू : केएल राहुल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, क्रिस गेल, प्रभसिमरन सिंह, मयंक अग्रवाल, सरफराज खान, हरप्रीत बराड़, दीपक हुड्डा, क्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई, इशान पोरेल, मुरगन अश्विन, दर्शन नालकंडे

किंग्स XI पंजाबने रिलीज केलेले खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, के गौतम, मुएब उर रहमान, जिमी नीशम, हार्डस विलोजेन, करुण नायर

संबंधित बातम्या :

IPL Auction 2021: हे सहा खेळाडू ठरू शकतात कोट्याधीश, आयपीएल लिलावात कोण होणार मालामाल?

IPL Auction 2021 Live Streaming | लिलाव कधी, कुठे, किती संघ सहभागी, कोणाकडे किती रक्कम?

(ipl franchise kings xi punjab change his name is now punjab kings before ipl auction 2021)