मुंबई : क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे (IPL Governing Council Meeting). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यांवरही बंदी आहे. मात्र, भारत सरकारने आता आयपीएलला परवानगी दिली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. इतकंच नाही तर आयपीएल सामन्यांचं शेड्युलही तयार झालं आहे. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत यूएईमध्ये खेळवला जाणार आहे (IPL Governing Council Meeting).
त्याशिवाय, महिलांचा आयपीएलही खेळवला जाणार आहे, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. आयपीएलचे सर्व स्पॉन्सर्स अबाधित आहेत, म्हणजे चिनी प्रायोजक विव्हो आयपीएलचे मुख्य स्पॉन्सर म्हणून कायम राहतील.
IPL to start on September 19, final on November 10
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2020
IPL ची फायनल 10 नोव्हेंबरला
आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. आयपीएल 53 दिवस चालणार आहे. आयपीएलची फायनल 10 नोव्हेंबरला खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यावेळी आपीएलमध्ये 10 डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत.
“आयपीएलचे सामने सायंकाळी साडे सात वाजेपासून खेळवले जाणार आहेत. आम्ही आयपीएलच्या नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटं आधी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. जे सामने आधी सायंकाळी 8 वाजता घेतले जात होते, ते सायंकाळी साडे सात वाजता खेळवले जाणार आहेत”, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
10 डबल हेडर होणार
“कठोर प्रोटोकॉल्समुळे सामन्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी 10 डबल हेडर घेण्यात येणार आहे. आम्ही 10 नोव्हेंबरला पहिल्यांदा विक डेला फायनल ठेवण्यात आली आहे”, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं (IPL Governing Council Meeting).
आईपीएल 2020 च्या महत्त्वाच्या बाबी
1) आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाणार
2) सायंकाळी साडे सात वाजता सामने सुरु होणार
3) सामन्याच्या सुरुवातीला प्रेक्षकांला कुठल्याही प्रकारची परवानही नाही.
4) सर्व संघ आयपीएलसाठी 26 ऑगस्टला यूएईसाठी रवाना होणार
5) आयपीएलचे सर्व प्रायोजक अबाधित
6) कोव्हिड सबस्टिट्यूटला परवानगी असेल
7) सर्व परदेशी आणि भारतीय खेळाडू चार्टेड प्लेनने प्रवास करणार
8) महिलांच्या आयपीएललाही परवानगी
9) आठ फ्रेंचायझीसाठी संघांची संख्या 28 खेळाडू इतकी असेल
‘आयपीएल 2020’ साठी यूएईच का?
भारताला कोरोनाचा मोठा फटका बसला असून बहुतांश शहरांना त्यातून सावरण्यासाठी मोठा काळ लागू शकतो, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.
यूएईमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक नाहीत, तेथील बाजारपेठा आणि मॉल्स आधीच खुले झाले आहेत. कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती आहे आणि पर्यटकांचेही स्वागत केले जात आहे. त्यातच यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यास विरोध करणाऱ्या जनहित याचिकाही स्थानिक कोर्टात दाखल होण्याची चिन्हं कमी आहेत.
यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती.
क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी20 लीग ‘आयपीएल 2020’ मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा हा ‘सण’ एक महिन्यात भेटीला येत आहे.
IPL 2020 Dates Announced | ‘आयपीएल 2020’ यूएईमध्ये रंगणार, तारखांची घोषणा https://t.co/F5jZfB4ey7 #IPL2020 #IPL13 #BrijeshPatel @BCCI @IPL
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2020
IPL Governing Council Meeting
संबंधित बातम्या :
वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूची आणखी एक किमया, गावातून कोरोनाला केलं हिट विकेट!