मुंबई इंडियन्सला 20 कोटी, KKR च्या रसेलवर पैशांचा पाऊस, कुणाला किती इनाम?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल फायनलमध्ये (IPL Final 2019) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अवघ्या 1 धावेने पराभव करुन आयपीएलचं चौथं जेतेपद नावावर केलं. चेन्नईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 तर सामना टाय करण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज होती. मुंबईच्या लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर चेन्नईच्या शार्दूल ठाकूरची विकेट घेत चेन्नईचा विजय हिसकावला. […]

मुंबई इंडियन्सला 20 कोटी, KKR च्या रसेलवर पैशांचा पाऊस, कुणाला किती इनाम?
Follow us on

मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल फायनलमध्ये (IPL Final 2019) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अवघ्या 1 धावेने पराभव करुन आयपीएलचं चौथं जेतेपद नावावर केलं. चेन्नईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 तर सामना टाय करण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज होती. मुंबईच्या लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर चेन्नईच्या शार्दूल ठाकूरची विकेट घेत चेन्नईचा विजय हिसकावला. या सामन्यात मुंबईने चेन्नईसमोर विजयासाठी 150 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र चेन्नईला 148 धावाच करता आल्या.

या विजयानंतर मुंबई इंडिन्सला मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. शिवाय विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांचं इनाम मिळालं. दुसरीकडे उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 12.5 कोटी रुपयांनी गौरवण्यात आलं.


बक्षीसांचा पाऊस

आयपीएलमध्ये सर्वाधिक 692 धावा करणारा, ऑरेंज कॅप विजेता सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. तर सर्वाधिक 26 विकेट घेत पर्पल कॅप पटकावणाऱ्या चेन्नईच्या इम्रान ताहीरलाही 10 लाख रुपयांचं इनाम देण्यात आलं.

कोणाला किती रक्कम?

मुंबई इंडियन्स : 20 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्ज : 12.5 कोटी रुपये

डेव्हिड वॉर्नर – ऑरेंज कॅप (सर्वाधिक 692 धावा) : 10 लाख रुपये

इम्रान ताहीर – पर्पल कॅप (सर्वाधिक 26 विकेट) : 10 लाख रुपये

शुभमन गिल – उदयोन्मुख खेळाडू/ एमर्जिंग प्लेयर अवॉर्ड- बक्षीस 10 लाख रुपये

आंद्रे रसेल –  मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर- 510 धावा : 10 लाख रुपये

के एल राहुल – स्टायलिश प्लेयर ऑफ द सीजन – 593 धावा : 10 लाख रुपये

आंद्रे रसेल – सुपर स्ट्राईकर ऑफ द सीजन – 593 धावा : कार आणि ट्रॉफी

आतापर्यंतच्या टॉप 5 फलंदाजांची यादी

डेविड वॉर्नर (हैदराबाद): 12 मॅच, 692 धावा, 100* बेस्ट, 69.20 सरासरी

लोकेश राहुल (पंजाब): 14 मॅच, 593 धावा, 100* बेस्ट, 53.90 सरासरी

शिखर धवन (दिल्ली) : 16 मॅच, 521 धावा, 97* बेस्ट, 34.73 सरासरी

आंद्रे रसेल (कोलकाता) : 14 मॅच, 510 धावा, 80* बेस्ट, 56.66 सरासरी

क्विंटन डी कॉक (मुंबई) : 15 मॅच, 500 धावा, 81 बेस्ट, 35.71 सरासरी

आतापर्यंतच्या टॉप 5 फलंदाजांची यादी

इमरान ताहीर (चेन्नई) 17 मॅच 26 विकेट

कॅगिसो रबाडा (दिल्ली) 12 मॅच 25 विकेट

दीपक चहर (चेन्नई) 17 मॅच 22 विकेट

श्रेयस गोपाल (राजस्थान) 14 मॅच 20 विकेट

खलील अहमद (हैदराबाद) 9 मॅच 19 विकेट

आईपीएल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट (Most Valuable Player) : बक्षीस – 10 लाख रुपये

आतापर्यंतचे Most Valuable Player

2008 – शेन वॉट्सन

2009 – एडम गिलख्रिस्ट

2010 – सचिन तेंडुलकर

2011 – ख्रिस गेल

2012 – सुनील नारायण

2013 – शेन वॉट्सन

2014 – ग्लेन मॅक्सवेल

2015 – आंद्रे रसेल

2016 – विराट कोहली

2017 – बेन स्टोक्स

2018 – सुनील नारायण

2019 – आंद्रे रसेल

संबंधित बातम्या

IPL Final : मुंबई मुंबई मुंबई, चेन्नईवर थरारक विजय !!!   

VIDEO : मुंबईच्या विजयानंतर धोनीचा 6 वर्षांचा चाहता संतापला, घरात किंचाळून राडा   

धोनीची विकेट आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली : सचिन तेंडुलकर  

पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार का? धोनी म्हणतो…   

मुंबई इंडियन्सचे दोन खेळाडू, ज्यांनी विजयाला दूर नेलं आणि पुन्हा जिंकूनही दिलं!