‘मी पैशांसाठी पगडी घालत नाही’, आयपीएलचा स्टार खेळाडू हरप्रीतची अक्षय कुमारला चपराक

| Updated on: May 01, 2021 | 4:37 PM

आयपीएल टीम पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू हरप्रीत ब्रारने अभिनेता अक्षय कुमारला जोरदार चपराक लगावलीय. मी पैशांसाठी पगडी घालत नाही असं म्हणत हरप्रीतने आय सपोर्ट फार्मर्स (#ISupportFarmers) असा हॅशटॅग वापरलाय.

मी पैशांसाठी पगडी घालत नाही, आयपीएलचा स्टार खेळाडू हरप्रीतची अक्षय कुमारला चपराक
Follow us on

नवी दिल्ली : आयपीएल टीम पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू हरप्रीत ब्रारने अभिनेता अक्षय कुमारला जोरदार चपराक लगावलीय. मी पैशांसाठी पगडी घालत नाही असं म्हणत हरप्रीतने आय सपोर्ट फार्मर्स (#ISupportFarmers) असा हॅशटॅग वापरलाय. हरप्रीतने आयपीएल 2021 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसोबतच्या सामन्यात तुफान फलंदाजी आणि गोलंदाजी केली. यानंतर तो आयपीएलचा स्टार खेळाडू झालाय. इंस्टाग्रावर एका युजरने तो सिंग इज ब्लिंग चित्रपटातील अक्षय कुमारसारखा दिसतो असं म्हटलं. त्याला उत्तर देताना हरप्रीतने या मेसेजचा स्क्रिनशॉट ट्विट केला आणि मी अक्षय कुमारप्रमाणे पैशांसाठी पगडी घालत नाही, असं मत व्यक्त केलं (IPL star cricketer Harpreet Brar criticize Akshay Kumar over Farmers Protest and Turban).

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा खेळाडून हरप्रीत ब्रारच्या झुंजार खेळीच्या बळावर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं. त्यानंतर तो रात्रीतून आयपीएलचा स्टार बनलाय. यानंतर लगेचच त्याचं 25 एप्रिल रोजीचं ट्विट व्हायरल होत आहे. यात त्याने एका युजरने त्याची तुलना अक्षय कुमारसोबत केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. या ट्विटमध्ये हरप्रीतने अक्षय कुमारच्या शेतकरी आंदोलनावरील भूमिकेला लक्ष्य केलंय. तसेच मी पैशांसाठी पगडी घालत नसल्याचं म्हटलं. यातून हरप्रीतने अक्षय कुमारवर थेट पैशांसाठी पगडी घालण्याचा हल्ला केलाय.

हरप्रीतकडून पंजाबमधील सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी भूमिका

क्रिकेटर हरप्रीत ब्रारचा ऑनलाईन वावर पाहिला तर तो स्वतः पगडी घालण्याबाबत अभिमान बाळगत असल्याचं दिसतं. त्याने याआधी पंजाबमधील सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेतलीय. पंजाबमधील मोगा भागातील 25 वर्षीय हरप्रीत ब्रारने आपल्या अष्टपैलू खेळाने पंजाबला विजय मिळवून दिलाय. त्यानंतर त्याचा आयपीएलच्या स्टार खेळाडूंच्या यादीत समावेश झालाय.

हरप्रीतची आयपीएलमधील बहुचर्चित कामगिरी

शुक्रवारी (30 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यात हरप्रीत ब्रारने 17 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. यावेळी त्याने कॅप्टन के. एल. राहुलला सोबत देत पंजाबची धावसंख्या 179 पर्यंत नेली. यानंतर गोलंदाजी करत असतानाही त्याने निर्णायक कामगिरी केली. फलंदाजी करताना आरसीबीने एक विकेट गमावत 60 धावा केल्या. यावेळी खेळपट्टीवर विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल सारखे तगडे खेळाडू पाय रोऊन उभे होते.

अशावेळी पंजाबला विजय मिळवणं अवघड होतं, तर बंगळुरु विजयाकडे घोडदौड करत होती. अखेर पंजाबच्या मदतीला हरप्रीत धावून आला आणि त्याने प्रभावी गोलंदाजी करत विराट आणि मॅक्सवेलला सलग दोन चेंडूत तंबूत धाडलं. त्यानंतर त्याने एबी डिव्हिलीयर्सलाही बाद केलं. अशाप्रकारे हरप्रीतने 25 धावा आणि 4 षटकांत 19 धावा देत महत्त्वाच्या 3 विकेट घेतल्या.

शेतकरी आंदोलनाला हरप्रीतचा जाहीर पाठिंबा आणि सहभाग

हरप्रीतचे ट्विटर अकाऊंट चाळले तर सहजपणे लक्षात येतं की हरप्रीत शेतकरी प्रश्नावर जाहीर भूमिका घेत आलाय. दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही त्याने सहभाग घेतला होता.

हेही वाचा : 

…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी

Photo: शाहरुख खान ते अक्षयकुमार… पाहा, कुणाला किती मान’धन’?

व्हिडीओ पाहा :

IPL star cricketer Harpreet Brar criticize Akshay Kumar over Farmers Protest and Turban