23 मार्चपासून IPL सुरु होणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलच्या 12व्या हंगामावर सुरु असलेल्या चर्चेवर मंगळवारी पूर्णविराम लागला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक समितीने आयपीएल 2019 भारतात खेळवण्यात जाईल असा निर्णय घेतला आहे. यापूर्वी असे समजले जात होते की, भारतात निवडणूक सुरु होणार असल्यामुळे आयपीएल दुसऱ्या देशात खेळवली जाणार आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र […]

23 मार्चपासून IPL सुरु होणार?
Follow us on

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलच्या 12व्या हंगामावर सुरु असलेल्या चर्चेवर मंगळवारी पूर्णविराम लागला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक समितीने आयपीएल 2019 भारतात खेळवण्यात जाईल असा निर्णय घेतला आहे. यापूर्वी असे समजले जात होते की, भारतात निवडणूक सुरु होणार असल्यामुळे आयपीएल दुसऱ्या देशात खेळवली जाणार आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र आज या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या सिईओ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल 2019 कोणत्या शहरात खेळवण्यात येईल यावरही चर्चा करुन या बैठकीत निर्णय घेण्यात आला.


बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या 12व्या हंगामासाठी 23 मार्च 2019 ही तारीख देण्यात आल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दरम्यान हे संपूर्ण वेळापत्रक संबधित अधिकाऱ्यांसोबत बोलून यावर निर्णय घेतला जाईल. सीईओ आयपीएल 2019 चे पूर्ण वेळापत्रक सादर करण्याआधी स्टेक होल्डर (भागिदार) यांच्यासोबतही चर्चा केली जाईल.

यावेळी आयपीएलच्या आयोजनाच्या तारखा आणि इंग्लडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तारखा एकाचवेळी येत होत्या. 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा सामना सुरु होत आहे आणि 14 जुलैपर्यंत तो सुरु राहणार आहे. प्रत्येकवर्षी आयपीएल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होते आणि मेच्या शेवटच्या आठवड्यात संपते. मात्र यंदा असे नाही होऊ शकत. जस्टिस लोढा समितीने केलेल्या शिफारशीनुसार, कोणत्याही आतंरराष्ट्रीय क्रिकेट टुर्नामेंट आणि आयपीएलमध्ये 15 दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे.

वर्ल्ड कपच्या तराखा पाहून आणि जस्टिस लोढा समितींच्या शिफारशीनुसार, असे समजलं जात आहे की या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल सामना सुरु करण्यात येईल.

आयपीएलचं दोन वेळा भारताबाहेर आयोजित केली होती. पहिल्यांदा 2009 मध्ये साऊथ आफ्रिकामध्ये आयोजित करण्यात आले होते तसेच मागच्या 2014 च्या निवडणुकांच्या दरम्यान संयुक्त अरबमध्ये आयपीएलचे आयोजन केले होते.