नवी दिल्ली: देशभर कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गानं आयपीएलला (IPL 2021 Postpone) गाठल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. आजचं आयपीएल खेळणारे आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आतापर्यंत आयपीएलच्या दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि कोलकाता संघ कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ अशा एकूण 12 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. (IPL suspended Delhi Kolkata Hyderbad Chennai Players support staff corona positive number increased)
दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. रिद्धिमान साहा हा गेल्या चार पाच दिवसांपासून आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती आहे. अमित मिश्रा आणि रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आयपीएलमधील कोरोनाबाधित खेळाडूंची संख्या 4 वर पोहोचली आहे.
SunRisers Hyderabad’s (SRH) Wriddhiman Saha tests positive for #COVID19, confirms SRH Management.#IPL2021
(File photo) pic.twitter.com/RlClGjfXNc
— ANI (@ANI) May 4, 2021
कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना लांबणीवर टाकण्यात आला होता.
दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा, सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा, कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झालीय. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशाप्रकारे आयपीएलशी संबधित 12 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या:
IPL Suspend : कोरोनाचा उद्रेक, BCCI ची मोठी घोषणा, आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित
(IPL suspended Delhi Kolkata Hyderabad Chennai Players support staff corona positive number increased)