दुबई : स्टार फिरकीपटू रवींचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) दुखापतीतून सावरत आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी शानदार पुनरागमन केलं आहे. आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात अश्विनला दुखापत झाली होती. त्यानंतर पुढचे सामने तो खेळू शकला नाही. त्यांनतर काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात त्याने पुनरागमन केले. या सामन्यात अश्विनने चार षटकं गोलंदाजी करुन 26 धावा देत एक विकेट घेतली. या सामन्यात दिल्लीच्या संघाने बँगलोरवर 59 धावांनी विजय मिळवला. (IPL2020 – First and final warning for 2020 – Ravichandra Ashwin tweets ‘Mankading’ alert)
या सामन्यानंतर मंकडिंगचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. अश्विन गोलंदाजी करत असताना त्याने चेंडू फेकण्याआधीच बँगलोरचा सलामीवीर अॅरॉन फिंच नॉन स्ट्राईकर सोडून धावू लागला होता. परंतु अश्विनने फिंचला मंकडिंग बाद करण्याऐवजी फिंचला वॉर्निंग देऊन सोडून दिले.
गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये अश्विनने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला मंकडिंग बाद केले होते. त्यानंतर खूप वादविवाद झाले. काहींनी अश्विनवर टीकादेखील केली. तसेच आश्विनला यंदा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने मंकडींग करण्याची परवानगी नाकारली होती. या मुद्द्यावरुन दोघांमध्ये स्पर्धेला सुरुवात होण्याआधी चर्चादेखील झाली होती. आश्विनचा मुद्दा योग्य असला तरीही मंकडींग करुन विजय मिळवण्याने मनात पोकळ भावना तयार होते, असं म्हणत पॉन्टिंगने आश्विनला मंकडिंगची परवानगी नाकारली होती.
दरम्यान, अश्विनने फिंचला मैदानावर वॉर्निंग दिल्यानंतर अश्विन शांत बासला नाही. सामना संपल्यानंतर अश्विनने ट्विटरद्वारे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना वॉर्निंग दिली आहे. अश्विनने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ही 2020 या वर्षातली पहिली आणि शेवटची वॉर्निंग होती. आत्ताच सांगतोय, परत मला दोष देऊ नका. पुढे त्याने दिल्लीच्या संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला टॅग केले आहे. तसेच अश्विनने यामध्ये म्हटले आहे की, मी आणि अॅरॉन फिंच खूप चांगले मित्र आहोत.
Let’s make it clear !! First and final warning for 2020. I am making it official and don’t blame me later on. @RickyPonting #runout #nonstriker @AaronFinch5 and I are good buddies btw.?? #IPL2020
— Ashwin ?? (@ashwinravi99) October 5, 2020
Ravi Ashwin wanted to mankad Aaron Finch, but he didn’t maybe because of Ricky Ponting’s statement of Delhi Capitals doesn’t support Mankading. pic.twitter.com/015wU98hcS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2020
संबंधित बातम्या
IPL 2020 : विराट कोहली ICC चे नियम विसरला, मागितली पंचांची माफी
एकीकडे आयपीएलची धामधूम, दुसरीकडे महिला टीम इंडियाचा परदेश दौराही ठरला
IPL 2020, RCB vs DC : विराटची ‘विराट’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय फलंदाज
(IPL2020 – First and final warning for 2020 – Ravichandra Ashwin tweets ‘Mankading’ alert)